केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात यंदाच्या वर्षी बदल करताना, आयोगाने प्रादेशिक भाषांचा पर्यायच काढून टाकला आहे. आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर मंगळवारी सादर केलेल्या नव्या अभ्यासक्रमावरून हे स्पष्ट झाले आहे. या अभ्यासक्रमाच्या पूर्वपरीक्षा एक आठवडा पुढे ढकलण्यात आल्या असून, त्या १८ ऐवजी २६ मे रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.
पूर्वीच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दोन वैकल्पिक विषयांची निवड करणे अत्यावश्यक होते. त्यामध्ये इंग्रजी (सक्तीचे) आणि कोणतीही एक प्रादेशिक भाषा यांचा समावेश होता. भारतीय प्रशासकीय सेवेत उच्च पदावर काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला किमान एका तरी भारतीय भाषेची चांगली ओळख असली पाहिजे, असा हेतू त्यामागे होता. नव्या अभ्यासक्रमात या दोन विकल्पांना फाटा देण्यात आल्याने प्रादेशिक भाषा हा विषयच अभ्यासक्रमातून बाद करून टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वीच्या दोन वैकल्पिक विषयांऐवजी २५० गुणांचा एकच विकल्प ठेवताना आयोगाने ४० ते ५० विविध विषयांची सूची दिली असून त्यापैकी कोणत्याही एका विषयाची निवड विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. त्या विषयासाठी २५० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका आता सोडवाव्या लागणार आहेत. सामान्यज्ञान या विषयांतर्गत आयोगाने पाचच विषयांची परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. त्यातील इंग्रजी निबंध आणि आकलन (एसे इंग्लिश, कॉम्प्रिहेन्शन) या विषयांसाठी तीनशे गुणांची प्रश्नपत्रिका असेल. बाकीच्या चारही विषयांच्या प्रश्नपत्रिका प्रत्येकी २५० गुणांची असेल. या चार विषयांमध्ये १) भारताचा इतिहास, संस्कृती, भारत व जगाचा भूगोल, २) राज्यघटना – कारभार प्रक्रिया, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध ३) विज्ञान आणि तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, पर्यावरण व ४) नीतितत्त्वे, एकात्मता आणि कौशल्य (एथिक्स, इंटेग्रिटी अॅण्ड अॅप्टिटय़ूड) यांचा समावेश आहे.
लोकसेवा आयोगाकडून प्रादेशिक भाषांची हकालपट्टी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात यंदाच्या वर्षी बदल करताना, आयोगाने प्रादेशिक भाषांचा पर्यायच काढून टाकला आहे. आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर मंगळवारी सादर केलेल्या नव्या अभ्यासक्रमावरून हे स्पष्ट झाले आहे. या अभ्यासक्रमाच्या पूर्वपरीक्षा एक आठवडा पुढे ढकलण्यात आल्या असून, त्या १८ ऐवजी २६ मे रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-03-2013 at 06:27 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expulsion of local language from upsc