सरकारने ओबीसी समाजाला दिलेले २७ टक्क्यांचे आरक्षणात आता १० टक्क्यांनी वाढ करून द्यावी, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागसालेल्या ओबीसींना अधिक न्याय मिळेल. तसेच भटक्या विमुक्त समाजला न्याय देण्यासाठी एक स्वतंत्र आरक्षणासह त्यांना राजकारणातही आरक्षण देण्याची तरतूद सरकारने करावी अशी मागणी सोमवार दि.१४ रोजी केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत केली आहे.

औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिना निमित्त केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री रामदास आठवले हे शहरात आले होते. यावेळी ते बोलत होते, पुढे बोलतांना ते म्हणाले की, देशात ओबीसी समाजाची जनसंख्या लक्षात घेता, समाजात वाढत असलेली आर्थीक तफावत वाढत असून एकुण परिस्थिती लक्षात घेता, केंद्र सरकारने ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षणाची तरतूद केलेली आहे. मात्र त्यात आता १० टक्यांनी वाढ करण्याची गरज आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला पुर्ण न्याय मिळेल, तसेच भटक्या विमुक्त समाजाला स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करून त्यांना राजकीय क्षेत्रात आरक्षण द्यावे यामुळे समाजाला न्याय मिळेल असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे.

( आणखी वाचा : नामविस्तार दिनानिमित्त आयोजित आठवलेंच्या सभेत आंबेडकरी कार्यकर्त्यांचा गोंधळ )

ही वंचित आघाडी नाही तर वंचित नेत्यांची आघाडी
भारिप बहूजन महासंघ आणि एमआयएम पक्षात होऊ घातलेली बहुजन वंचित आघाडी ही वंचित समाजाची आघाडी नाही तर वंचित नेत्यांची आघाडी आहे. या आघाडीचा निवडणूकीत कोणताच फरक पडणार नाही, उलट या आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे मत विभाजन होऊन त्याचा फायदा भाजप तसेच मित्र पक्षाला होणार असल्याचा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.

१० फेब्रुवारीला आरपीआयचा भव्य मेळावा
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया ए चा येत्या येत्या १०फेब्रुवारीला भव्य मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा औरंगाबाद येथील जबिंदा मैदानावर होणार असून या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजप प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे

Story img Loader