जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी सातव्या दिवशीही उपोषण सुरू ठेवलं आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र मिळावं, मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुद्द्यावरून त्यांनी आंदोलन छेडलं आहे. या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी (१ सप्टेंबर) सायंकाळी लाठीहल्ला केला. या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या लाठीहल्ल्याचे राज्यभर तीव्र पडसात उमटले आहेत. दरम्यान, राज्य सरकारचे अनेक प्रतिनिधी जालन्यात जाऊन आंदोलकांची आणि मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेत आहेत.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी काही वेळापूर्वी जालन्यात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीला जाण्यापूर्वी खोतकर यांनी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी अर्जुन खोतकर म्हणाले या आंदोलनात काही बाहेरचे घटक घुसले होते, या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे.

mla Vijay Shivtare of Shiv Sena Shinde faction has been removed from District Planning Committee
आमदार शिवतरेंना वगळले, महायुतीत वादाची ठिणगी ?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Eknath shinde bjp loksatta
एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळेच पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती
mahayuti dispute on guardian ministership
विश्लेषण : पालकमंत्रीपदावरून महायुतीत ठिणगी कशासाठी? भाजपवर शिंदे गट नाराज?
Badlapur Sexual Assault Case, Akshay Shinde Encounter Case, Akshay Shinde ,
भाजपच्या सांगण्यावरून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, माजी गृहमंत्र्यांचा थेट आरोप

अर्जुन खोतकर म्हणाले, मी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आहे. त्यानुसार मी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलणार आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या वतीने त्यांच्याशी बोलणार असून त्यांचे मुद्दे जरांगे-पाटलांसमोर मांडणार आहे. मी पाटलांना सांगणार आहे की आता मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या कामाला गती आली आहे. मी तिथे त्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर बोलणं करून देणार आहे.

अर्जुन खोतकर म्हणाले, मराठा सामाजाने आतापर्यंत लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले. परंतु, तेव्हा त्यांनी रस्त्यावर कुठे साधी काडी पडू दिली नाही. मराठा स्वयंसेवकांनी कचरासुद्धा साफ केला. परंतु, जालन्यात आंदोलन सुरू असताना दगडफेक करणारे, रुग्णांना मारणारे मराठे असू शकत नाहीत. काही लोकांना आपली पोळी भाजून घ्यायची होती. त्या लोकांनी त्यात हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला आणि या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा >> “लाठीहल्ल्याचे आदेश मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी दिले”, विरोधकांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले…

काही बाहेरचे लोक, बाहेरचे घटक या आंदोलनात घुसले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. हा सगळा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित होता. त्यामुळे सगळे लोक आता जालन्याला येऊ लागले आहेत, आंदोलकांना भेटू लागले आहेत. येथे सर्वांना आपापलं राजकारण करायचं आहे. परंतु, चौकशीअंती ते समोर येईलच.

Story img Loader