मु्ंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाकडून तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, अनिस इब्राहिम आणि इक्बाल कासकर विरोधात गुन्हा दाखल केला.
मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने २०१५ मध्ये बोरीवलीतील गोराई येथे ३८ एकरची जागा घेतली होती. यासंदर्भात जमीन मालक आणि व्यावसायिकामध्ये करार झाला. मात्र काही कारणास्तव बांधकाम व्यावसायिकाला हा करार मार्गी लावता आला नाही. या कालावधीत जमीन मालकाने बांधकाम व्यावसायिकाकडे आणखी पैशांची मागणी केली. जमिनीचा भाव वधारल्याने जमीन मालकाने पैशांचा तगादा लावला. मात्र हा करार रद्द करताना दोन कोटी रुपये दिल्याचे सांगत बांधकाम व्यावसायिकाने आणखी पैसे देण्यास नकार दिला. शेवटी हा वाद जमिनीचा करार करणाऱ्या रिअल इस्टेट एजंटकडे पोहोचला. रिअल इस्टेट एजंटने या प्रकरणात इकबाल कासकरची मदत घेतली.
कासकर आणि त्याच्या साथीदारांनी बांधकाम व्यावसायिकाला धमकी द्यायला सुरुवात केली. जमीन मालकाने आमच्याशी व्यवहार केला असून तू या करारातून बाहेर पड. तसेच जिवंत राहायचे असेल तर ३ कोटी रुपये दे, अशी मागणी त्याच्याकडे केली. कासकरने बांधकाम व्यावसायिकाकडून १ कोटी रुपये घेतल्याचे समजते. शेवटी याप्रकरणात बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी इकबाल कासकर, दाऊद इब्राहिम आणि अनिस इब्राहिमसह आणखी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. दाऊद आणि अनिसने तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाला फोनवरुन धमकी दिली का?, या दोघांचा गुन्ह्यातील सहभाग काय हे अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
इकबाल कासकरविरोधातील हा तिसरा गुन्हा असून आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी कासकरला अटक झाली आणि दाऊद टोळी अजूनही सक्रीय असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणात दाऊदचा विश्वासू साथीदार छोटा शकील याचे नावही समोर आले होते.
Maharashtra: Dawood Ibrahim's brother Iqbal Kaskar & his aide produced in Thane court in extortion case; sent to Police custody till 10 Oct. pic.twitter.com/jtvJ7GeJPm
— ANI (@ANI) October 4, 2017
इकबाल कासकरविरोधातील हा तिसरा गुन्हा असून आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी कासकरला अटक झाली आणि दाऊद टोळी अजूनही सक्रीय असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणात दाऊदचा विश्वासू साथीदार छोटा शकील याचे नावही समोर आले होते. कासकरला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.