दाम्पत्यावर सव्वा कोटीचे बक्षीस

गडचिरोली : एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य जहाल नक्षलवादी सुधाकरन व २५ लाख रुपये बक्षीस असलेली त्यांची पत्नी नीलिमा यांनी तेलंगणा पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यामुळे नक्षल चळवळीसंबंधी अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येणार आहेत.

नक्षलवादी सुधाकरन हा मूळचा तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील रहिवासी होता. नक्षल दलममध्ये भरती झाल्यानंतर तो सध्या नक्षलवाद्याच्या केंद्रीय समितीचा सदस्य म्हणून काम पाहत होता, तर नीलिमा ही तेलंगणा राज्यातील वरांगल येथील निवासी होती. आज सुधाकरन व त्याची पत्नी नीलिमाने तेलंगणा पोलिसांसमोर शरणागती पत्करली. सुधाकरनने झारखंडमध्ये मोठय़ा प्रमाणात संपत्ती जमा करून ठेवली आहे. विशेष म्हणजे, ३० ऑगस्ट २०१७ ला चुटिया पोलीस ठाण्याच्या परिसरात नलक्षवादी सुधाकरन याचा सहयोगी नक्षलवादी सत्यनारायण रेड्डी व सुधाकर के भाई बी नारायणला अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांच्याकडून २५ लाख रुपये रोख व अर्धा किलो सोनं तसेच बनावट दस्तावेज जप्त करण्यात आले होते. ही रोख  तेलंगणात जात होती. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Story img Loader