शिवप्रतिष्ठानचे संस्थापक आणि अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटू लागले आहेत. याबाबत राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिल्यानंतर विधान परिषदेतही विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. याप्रकरणी सभागृहात चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगत आतापर्यंत संभाजी भिडे यांना अटक का झाली नाही, असा सवाल काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे. २८९ च्या प्रस्तावावर भाई जगताप बोलत होते.

भाई जगताप म्हणाले, “शिवप्रतिष्ठान संस्थेचा एक स्वयंघोषित, एक विकृत माथेफिरू माणूस आहे. त्याचं नाव मनोहर कुलकर्णी. त्याला स्वतःचं नाव लावण्याचीही लाज वाटते. तो संभाजी भिडे या नावाने आज या संस्थेचा प्रमुख म्हणून वावरतो. अतिशय निर्लज्ज, विकृत, समाजात तेढ निर्माण करणारा माणूस ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहे, त्यामुळे देशाचे आणि राज्याचं नाव खराब होतंय”, अशी टीका भाई जगताप यांनी केली.

devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Bhokardan , Raosaheb Danve,
‘माजी’ झाल्याने फरक पडत नाही, फक्त नाव पुरेसे, माजी खासदार रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Raut on Devendra Fadnavis
Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस लाचार, हतबल मुख्यमंत्री; पालकमंत्रीपदाचा निर्णय बदलताच संजय राऊत यांची टीका
loksatta readers response
लोकमानस : भारतालाही फटका बसण्याची शक्यता

हेही वाचा >> “संभाजी भिडे गुरुजी हिंदुत्वासाठी…”, विधानसभेत विरोधकांनी अटकेची मागणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

“महात्मा गांधींबद्दल या देशात आणि जगात लौकिक आहे. संपूर्ण जग ज्यांच्यासमोर नतमस्तक होतं, अशा माणसाबद्दल अनुद्गार काढण्यात आले आहेत, त्यासंदर्भात आज सभागृहात चर्चा होणे गरजेचं आहे. हा माणूस बेताल आणि विकृत आहे. या माणसाने देशाच्या स्वातंत्र्याबद्दलही असे अपशब्द काढले आहेत. हा माणूस डोक्यावर गांधी टोपी घालतो आणि या सडलेल्या डोक्यात अशा पद्धतीचे विकृत विचार येतात. राज्यभर त्याच्याविरोधात राण उठलेले आहे. छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी चर्चा होणे गरजेचे आहे. पाच ठिकाणी त्याच्याविरोधात केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. आतापर्यंत कारवाई झाली नाही. त्याला तात्काळ अटक व्हायला हवी होती, चार दिवस हा बेताल माणूस एसी गाड्यातून फिरतोय. लाज वाटतेय या महाराष्ट्रात. या विकृत माणसाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न का केला जातोय? याची चर्चा होणे गरजेच आहे. त्याचा बोलवता धनी कोण, हे सर्व कोण करतंय, हे सुद्धा महाराष्ट्राच्या लोकांसमोर येणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या लौकिशाशी निगडीत हा विषय आहे , असं भाई जगताप यांनी मांडलं.

दरम्यान, “या विषयावर विधानसभेत चर्चा झाली असून विधान परिषदेतही देवेंद्र फडणवीस निवेदन सादर करतील. त्यांच्या निवदेनाने जर समाधान नाही झाले तर तुम्ही तुमचा प्रश्न मांडू शकता”, असं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या. मात्र, या विषयावर तातडीने चर्चा घेण्यावर भाई जगताप ठाम राहिले. त्यामुळे विधान परिषदेतील इतर विरोधी पक्षातील आमदारांनाही याविषयी आवाज उठवला. विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातल्याने अखेर नीलम गोऱ्हे यांना सभागृह स्थगित करावे लागले. दहा मिनिटांनी पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात संभाजी भिडेप्रकरणी निवेदन सादर केले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“कुराण अँड द फकीर या १९२ पानी पुस्तकात विसाव्या प्रकरणात हा वादग्रस्त भाग आहे. त्याचे वाचन केल्याचे व्हिडीओत दिसते. याप्रकरणी अमरावती बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी १५३ अ, ५००, ५०५ (२), ३४, मकोकासह २९ जुलै रोजी संभाजी भिडे आणि अन्य दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे”, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

ठसंभाजी भिडे यांना सीआरपीसीच्या कलम ४१ अ अंतर्गत नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी संभाजी भिडे यांच्याशी संपर्क साधला आहे. तसेच त्यांनी नोटीस स्वीकारली आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी होईल. अमरावतीतल्या त्यांच्या सभेचा व्हिडीओ उपलब्ध नाही. त्याचबरोबर समाजमाध्यमांवर जे व्हिडीओ फिरत आहेत, ते निरनिराळ्या ठिकाणचे व्हिडीओ आहेत. त्या व्हिडीओंचे व्हॉईस सॅम्पल्सही तपासले जातील आणि याप्रकरणी कारवाई होईल. एका माध्यमाने अन्य व्हॉइस क्लिप दाखवली आहे, तिथे दोन वेगवेगळे आवाज येत आहेत. ते पडताळून पाहण्यात येणार आहे”, असंही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांशी आणि त्यांच्या किल्ल्यांशी बहुजनांना जोडण्याचं काम करतात. हे त्यांचं कार्य चांगलं आहे. परंतु, त्यांना महापुरुषांबद्दल अशा प्रकारची वक्तव्ये करण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही. त्यांनाच काय, दुसऱ्या कोणालाही अशा प्रकारचा अधिकार नाही. महापुरुषांबद्दल अशा प्रकारे वक्तव्ये केली तर कारवाई होईल.”

Story img Loader