ल्युब्रिकंट्स उत्पादनातील अग्रगण्य ExxonMobil कंपनी रायगडमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या इसांबे औद्योगिक क्षेत्रात ल्युब्रिकंट्स उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. यासाठी जवळपास ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ExxonMobil कंपनीने ही घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर, उत्पादन, पोलाद, उर्जा, खाणकाम आणि बांधकाम, तसेच प्रवासी आणि व्यावसायिक वाहन विभागातील औद्योगिक क्षेत्रांमधील वाढत्या देशांतर्गत मागणीची पूर्तता करण्यासाठी वार्षिक १ लाख ५९ हजार किलोलिटर ल्युब्रिकंट्स तयार करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये असेल. २०२५ च्या अखेरीस या प्रकल्पाचे कार्य सुरू होण्याची अपेक्षा आहे.

“आम्हाला आमच्या पहिल्या ग्रीनफिल्ड गुंतवणुकीबरोबर भारताप्रती असलेली आमची दीर्घकालीन वचनबद्धता अधिक दृढ करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आकर्षक गुंतवणुकीच्या वातावरणामुळे महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र आहे, हा आमच्या ल्युब्रिकंट्स प्रकल्पासाठी नैसर्गिक उत्तम पर्याय आहे,” असं भारतातील ExxonMobil च्या संलग्न कंपन्यांचे प्रमुख कंट्री व्यवस्थापक मॉन्टे डॉब्सन म्हणाले.

“मेक इन इंडिया” उपक्रमाला चालना देण्यासाठी, प्लांट बेस स्टॉक, अॅडिटीव्ह आणि सर्व पॅकेजिंगचा मोठा भाग स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात देईल. बांधकामाच्या टप्प्यात १ हजार २०० नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

“भारतातील उच्च-कार्यक्षमता ल्युब्रिकंट्स पुरवठादारांपैकी एक म्हणून आमचे स्थान मजबूत करण्याच्या दिशेने हे एक बदलाचे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. स्थानिक पातळीवर उत्पादन केल्याने आमची पुरवठा साखळी सुलभ होईल. ज्यामुळे आम्हाला आमच्या भारतीय ग्राहकांच्या आणि उपभोक्त्यांच्या गरजा अधिक सहजतेने पूर्ण करता येतील,” अशी प्रतिक्रिया ExxonMobil चे सीईओ विपिन राणा म्हणाले.