गेले काही दिवस सातत्याने विनयभंग आणि छेडछाडीचे प्रकार सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील पिवळी गावातही एका १५ वर्षीय विद्यार्थिनीचा भर रस्त्यात विनयभंग केल्याची घटना घडली असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
सारमाळ येथील एक विद्यार्थिनी शिक्षणासाठी पिवळी येथे मावशीकडे राहते. नववीमध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी पिवळी पाईप लाईनजवळील रस्त्याने शाळेत जात असताना वाटेत भिवंडी तालुक्यातील पाच्छापूर येथील हेमंत जाधव याने तिचा विनयभंग केला. तसेच याप्रकरणाची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. भयभीत झालेल्या या मुलीने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करून घेत घर गाठले. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      

Story img Loader