परळीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वातानुकूलित बसला अडवून १५ ते २० जणांनी पेट्रोल टाकून पेटवून दिले. परळी शहराजवळील शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर ही घटना घडली. बसच्या चालकासही दगडाने मारहाण केली. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परळी शहरात तणावाचे वातावरण होते. याच टोळक्याने अन्य एका बसवरही दगडफेक केली. फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर आल्यामुळे १५ ते २० जणांच्या जमावाने हे कृत्य केल्याचे समजते.
परळी पोलिसांनी सांगितले, की परळी आगारातून त्र्यंबकेश्वरकडे सकाळी ६ वाजून पाच मिनिटांनी (एमएच ०६ सी ९२०६) ही वातानुकूलित बस सोडण्यात आली. सकाळीच या बसला थांबवून चालक बाबासाहेब दादा भिसे याला मारहाण करण्यात आली. प्रवाशांना खाली उतरवून बसवर पेट्रोल टाकून ती जाळण्यात आली. याच जमावाने परळी आगारातील अन्य एका बसवरही दगडफेक केली. बसला आग लावल्याचे कळताच वाहतूक नियंत्रक नंदकिशोर कदम यांनी अग्निशामक दलास बोलावले. तोपर्यंत बस जळाली होती. या घटनेची फिर्याद बसचे चालक बाबासाहेब भिसे यांनी परळी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकारानंतर परळी आगारातून सुटणाऱ्या सर्व बसची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे श्रीक्षेत्र कपिलधार येथील मन्मथ स्वामींच्या यात्रेसाठी आलेले भाविक परळीत अडकून पडले.
फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर परळी येथे वातानुकूलित बस जाळली
परळीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वातानुकूलित बसला अडवून १५ ते २० जणांनी पेट्रोल टाकून पेटवून दिले. परळी शहराजवळील शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर ही घटना घडली. बसच्या चालकासही दगडाने मारहाण केली. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परळी शहरात तणावाचे वातावरण होते.
First published on: 29-11-2012 at 05:27 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook comment case one make burnfire of air condition bus in parli