अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका वाढला आहे. तर, या दोन्ही जिल्ह्यांना असलेला पुराचा धोका टळावा यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याशी अलमाटी धरणातून पाणी सोडले जावे यासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
सांगली, कोल्हापूरला निर्माण झालेला पुराचा धोका टाळण्यासाठी अलमाटी धरणातून पाणी सोडावे याकरता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याशी बोलत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना लवकर यश येईल अशी आशा आहे. असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विद्वारे सांगितलं आहे.
#सांगली, #कोल्हापूर ला निर्माण झालेला पुराचा धोका टाळण्यासाठी #अलमाटी धरणातून पाणी सोडावे याकरता भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. @ChDadaPatil व आमचे नेते मा. @Dev_Fadnavis कर्नाटक मुख्यमंत्री @BSYBJP बोलत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना लवकर यश येईल अशी आशा आहे.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 23, 2021
तसेच वेळ अशी ओढवली आहे की, शेकडो घरांमध्ये, संकट सरेपर्यंत चूलदेखील पेटणार नाही… शिजविण्यासाठी अन्नधान्य नाहीच, पण चहूकडे पाणी पसरलेले असताना पिण्यासाठी मात्र थेंबही नाही. तातडीने किमान पिण्याचे पाणी व बिस्किटे पुरवली पाहिजेत. असं म्हणत कोकणताील किती गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. तसेच किती गावांमध्ये सरकारची मदत यंत्रणा पोहोचली आहे याची माहिती सरकारने कोकणाबाहेरील त्यांच्या चिंताग्रस्त नातेवाईकांना द्यायला हवी. सरकारी यंत्रणांनी केलेल्या मदतीची माहिती व कोणत्या गावांमध्ये आज काय स्थिती आहे याबाबतचे प्राथमिक माहितीचे बुलेटिन तरी आज तातडीने जारी करावे, अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या धोका पातळीकडे
याचबरोबर, कोकणवासीयांना सध्या तातडीने मदतीचा गरज आहे कोकणाला गेल्या दीड वर्षांत निसर्गाने भयानक फटके दिले. आधी निसर्ग वादळाने सारे काही जमीनदोस्त केले, मग तोक्ते वादळाने पुरते उद्ध्वस्त करून टाकले, आणि त्यातून जे काही बचावले, ते महापुराने धुवून नेले. अतिवृष्टीमुळे मालमत्ता, घरेदारे, होत्याची नव्हती झाली. जीव, जनावरे केविलवाणे झाली. संगमेश्वरची सोनवी नदी, लांजा येथील काजळी नदी, राजापूरची कोदवली नदी, बाव नदी या नद्या धोक्याची पातळी ओलांडून रौद्ररूप धारण करीत रोरावत आहोत. दरडी कोसळण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पूरक्षेत्राबाहेरील व दरडींच्या संकटक्षेत्रात असलेल्या कुटुंबांना तातडीने सुरक्षित जागी हलविण्याची गरज आहे असंही सांगण्यात आलं आहे.