Shyam Manav Breaking News: देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना त्यांच्यावर दबाव टाकला होता. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अनिल परब या सगळ्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव होता, हा धक्कादायक दावा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव ( Shyam Manav ) यांनी केला आहे. या आरोपांमुळे खळबळ माजली आहे. त्यांनी अजित पवारांचं नाव घेत त्यांच्याविरोधातही एक प्रतिज्ञापत्र तयार होतं असं म्हटलं आहे. या आरोपांवर अनिल देशमुख यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच आपल्याकडे याचे पुरावे असल्याचंही म्हटलं आहे.

हे पण वाचा- Anil Deshmukh on Devendra Fadnavis: “आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला असा…”, अनिल देशमुख यांचं मोठं विधान; देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप!

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Santosh Deshmukh murder case, Santosh Deshmukh murder,
संतोष देशमुख हत्या प्रकरण; नवीन एसआयटी
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Suresh Dhas
Suresh Dhas : “…तर बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा ही नंतरची गोष्ट”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
What Suresh Dhas Said About Walmik Karad?
Suresh Dhas : “संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना मोक्का लावा, यांचा ‘तेरे नाम’ मधला सलमान…”; सुरेश धस यांची टीका

काय आहेत श्याम मानव यांचे आरोप?

“अनिल देशमुख गृहमंत्री असताना काही लोकांकडून सांगण्यात आलं होतं की, तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून स्वतःची सोडवणूक करून घ्यायची असेल, तर तुम्ही १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावं. आदित्य ठाकरे यांचं नाव दिशा सालियन बलात्कार आणि हत्या प्रकरणात घ्यावं, अनिल परब यांचंही नाव त्यांच्याशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांच्या प्रकरणात घ्यावं. मात्र, अनिल देशमुख यांनी तसं केलं नाही.” असा आरोप श्याम मानव ( Shyam Manav ) यांनी केला आहे.

What Aditya Thackeray Said?
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना अडकवण्यासाठी अनिल देशमुखांवर दबाव होता असा आरोप श्याम मानव यांनी केला आहे. (फोटो-एक्स पेज, आदित्य ठाकरे)

अनिल देशमुख यांच्यावर अजित पवारांबाबतही दबाव होता

“अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणून त्यांनी तपास यंत्रणांना जबाब द्यावा की, अजित पवारांनी पार्थ पवारांच्या उपस्थितीत त्यांना देवगिरी बंगल्यावर बोलावून गुटखा व्यवसायिकांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करून द्यावी, असं सांगितलं होतं. मात्र अनिल देशमुख यांनी तसं करण्यासही नकार दिला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना तुम्ही अजित पवारांना अडकवू शकत नसले, तरी किमान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांची नावं घेऊन त्यांना खोट्या प्रकरणात अडकवा, अशी नवी ऑफरही देण्यात आली होती”, असा आरोप श्याम मानव यांनी केला आहे.

मी अनिल देशमुख यांना सलाम करतो

“अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब या तिघांचं नाव घेण्यास नकार दिला. त्यामुळेच अनिल देशमुख यांना १३ महिने तुरुंगात राहावं लागलं, असा दावा श्याम मानव यांनी केला आहे. संजय राऊत यांनाही अशाच पद्धतीनं खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं” असा दावाही श्याम मानव यांनी केला आहे. तसंच अनिल देशमुख हे दबावाला बळी पडले नाहीत त्यासाठी मी त्यांना सलाम करतो असं श्याम मानव ( Shyam Manav ) म्हणाले.

अनिल देशमुख यांनी या आरोपांबाबत काय म्हटलं आहे?

“मला तीन ते चार प्रतिज्ञापत्रं त्यांनी (देवेंद्र फडणवीस) मला करून द्यायला सांगितली होती. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी कुणावरही खोटे आरोप करणार नाही. हे सांगितल्यामुळे, प्रतित्रापत्र करून देण्यास नकार दिल्यामुळे माझ्यामागे ईडी-सीबीआय लावून मला अटक करण्यात आली असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. तसंच श्याम मानव ( Shyam Manav ) यांनी जो दावा केलाय तो योग्यच आहे माझ्याकडे त्या सगळ्याचे पुरावे आहेत असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

Story img Loader