Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी आज (१ नोव्हेंबर) सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती. यामध्ये राज्यातील ३२ आमदार आणि विविध पक्षातील नेते उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासंदर्भात ठराव झाला आहे. मात्र, यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेण्यावर एकमत झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यावरून मनोज जरांगे पाटलांनी संताप व्यक्त केला असून अजून किती वेळ द्यायचा असा सवालही उपस्थित केला आहे.

“सरकारने आता वेळ मागितला आहे. मी उपोणषाला बसून ७-८ दिवस झाले. पण, आता सांगत आहेत की वेळ हवाय. कशासाठी आणि किती वेळ हवाय हे सरकारने सांगावं. मग मी समाजाशी बोलून वेळ द्यायचा की नाही ते ठरवेन”, असं मनोज जरांगे म्हणाले. तसंच, “आजच्या बैठकीतील तपशील पाहण्याची माझी इच्छा नाही. गोर गरिबांच्या पोरांना अन्याय सहन करावा लागत असातना हे नेते हसण्यावारी नेत आहेत. यांना जनता सांभाळणारं सरकार म्हणायचं का?” असा सवालही जरांगेंनी विचारला.

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी

हेही वाचा >> Breaking: मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक संपली, काय ठरलं? वाचा सविस्तर ठराव!

“आम्ही चर्चेला चार दिवसांपासून बोलवत आहोत, पण ते येत नाहीत. पण यांना काड्या घालायची सवय लागली आहे. त्यामुळे मराठ्यांमध्ये दम निघत नाही. मराठे तापट आहेत. तुम्हाला आरक्षणासाठी वेळ हवा असेल तर मला बोलता येतंय तोवर चर्चेसाठी या. तुम्हाला किती वेळ हवाय ते सांगा. देवेंद्र फडणवीसांनी चर्चेसाठी यावं, रस्त्यांवर तुम्हाला कोणीही अडवणार नाही. माझे मराठा तुम्हाला संरक्षण देतील. पण आज संध्याकाळपासून मी पाणीही सोडणार आहे, मग बघू मराठ्यांना कसं आरक्षण देत नाहीत”, असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला.

हेही वाचा >> “आपण एका ताटात जेवलोय म्हणून सांगते…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सावधानतेचा इशारा; म्हणाल्या…

सरकारला कशासाठी आणि किती वेळ हवाय हे त्यांनी सांगावं, मराठ्यांना कसं आरक्षण देणार आहेत हे सांगावं, वेळ घेतल्यानंतर सरसकट आरक्षण देणार आहात का? हे सांगा, त्यानंतर आम्ही वेळ द्यायचा की नाही ते ठरवू. नाहीतर पाच मिनिटांचाही वेळ देणार नाही. मग काय व्हायचंय ते पाहू, असंही ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटलाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • आमच्या रक्तामासांत लढण्याची शक्ती आहे. त्यामुळे सरकारने बाजारचाळे करू नका, नेट सुरू करा. मराठे शांततेत आंदोलन करणार. ही लढाई आरपारची आहे. नेट बंद केल्याने आंदोलन थांबणार नाही.
  • आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.
  • सर्वपक्षीय बैठकीत सर्व नेते होते. कोणताच पक्ष आपला नाही हे आता मराठ्यांना समजलं.
  • सरकारला वेळ द्यायचा की नाही हे समाजाशी बोलून ठरवलं जाईल.
  • आज रात्रीपासून पाणी बंद
  • उद्रेकाला आमचं समर्थन नाही, आमचं आंदोलन शांततेत सुरू राहणार आहे.