अलिबाग: महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र शनिवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे. मात्र हे पत्र बनावट असल्याचे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. असे कुठलेही पत्र अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वतीने जारी करण्यात आले नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणादरम्यान श्री सदस्यांच्या उष्माघाताने झालेल्या मृत्यूमुळे राजकारण तापले असतानाच, शनिवारी अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले ज्यात राज्य सरकार कारभारावर प्रश्न उपस्थित केले गेले होते. शासनाने दिलेला पुरस्कार परत करणार असल्याचेही नमूद करण्यात आले होते. माझ्या अनुयायांचा मतांसाठी उपयोग करून घेतला, साधकांसाठी मंडप टाकला नाही. त्यामुळे यापुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका असे आवाहनही करण्यात आले होते.

Former Chief Election Commissioner Naveen Chawla passes away
माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांचे निधन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
abhishek lodha and abhinandan lodha
व्यापारचिन्हाबाबतचा वाद मध्यस्थांमार्फत सोडवण्यास लोढा बंधुंची सहमती, माजी न्यायमूर्ती रवींद्रन यांची मध्यस्थी म्हणून नियुक्ती
Marotrao Gadkari passed away, Senior Gandhian thinker, Marotrao Gadkari , Marotrao Gadkari news,
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मा. म. गडकरी यांचे निधन, विनोबाजींच्या भूदानयज्ञात त्यांनी…
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
history of Prayagraj
Maha Kumbh Mela 2025: २५०० वर्षांहून प्राचीन असलेल्या ‘प्रयागराज’चा पुरातत्त्वीय इतिहास नेमकं काय सांगतो?
Murder accused nabbed after 15 years
पत्नीची हत्या, फरार पतीला १५ वर्षांनी अटक
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”

समाजमाध्यमांवर हे पत्र वेगाने प्रसारित होण्यास सुरुवात झाल्यामुळे खळबळ उडाली होती. याबाबत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रवक्ते तथा अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांच्याकडे विचारणा केली असता हे पत्र बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणी तरी खोडसाळपणा करून यापूर्वी अप्पासाहेबांनी काढलेल्या पत्राचा वापर करून त्यातील मूळ मजकूर काढून त्यात, फेरफार करून हे पत्र तयार केले असल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

Story img Loader