अलिबाग : ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र प्रसिद्ध केल्या प्रकरणी रायगड पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. या प्रकरणाचे बारामती कनेक्शन समोर आलंय. पोलिसांनी यात एकाला ताब्यात घेतले आहे. शुभम काळे नावाच्या तरुणाला रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे. आज त्याला अलिबाग न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/04/WhatsApp-Video-2023-04-24-at-17.21.12.mp4

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : एकनाथ शिंदेंमुळे भाजपा रसातळाला! संजय राऊत यांचा आरोप; यासह राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्घटनेनंतर डॉ. आप्पासाहेब यांनी जो शोकसंदेश प्रसारित केला होता त्या पत्राचा आधार घेत बनावट पत्र तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. त्यात आपण पुरस्कार परत करणार आसून यापुढे भाजप व शिंदे गटाला मतदान करू नका असा मजकूर छापण्यात आला होता. या बनावट पत्र प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake letter in the name of appasaheb dharmadhikari raigad police arrested one from pune asj
Show comments