Maha Vikas Aghadi Lok Sabha Seat Sharing Formula : पुढच्या वर्षी (२०२४) होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याच्या बातम्या आज सकाळपासून माध्यमांवर पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातल्या एकूण ४८ जागांपैकी २१ जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला, १९ जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि केवळ ८ जागा काँग्रेस लढवणार असल्याच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या आहेत. दरम्यान, “या सर्व बातम्या खोडसाळ असल्याचं कांग्रेस नेते अतुल लोंढे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने स्पष्ट केलं आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतुल लोंढे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची, जिल्हाध्यक्षांची एकत्रित बैठक नुकतीच पार पडली. आम्ही आगामी काळात होणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढू असा निर्धार केला आहे. परंतु कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढेल हे अद्याप ठरलेलं नाही.”

हे ही वाचा >> “नरेंद्र मोदी नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार, रशिया-युक्रेन युद्धात…”, नोबेल समितीकडून भारतीय पंतप्रधानांचं कौतुक

काँग्रेसकडून सर्व बातम्यांचं खंडण

लोंढे म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या फॉर्म्युलाबाबतची बातमी जिथून कुठून पसरली आहे ती चुकीची आहे. या बातम्यांचं आम्ही खंडण करतो.” लोकसभा निवडणुकीत शिवसेना २१, राष्ट्रवादी १९ आणि कांग्रेस ८ जागा लढवेल अशा आशयाच्या बातम्या पसरू लागल्या आहेत. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, राज्यातल्या ४८ पैकी पाच ते सहा जागांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सहमती झालेली नाही. त्यामुळे या फॉर्म्युलामध्ये बदल पाहायला मिळू शकतो. परंतु या बातम्या खोट्या असल्याचं मविआने जाहीर केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: False news viral regarding maha vikas aghadi lok sabha seat sharing formula says atul londhe congress asc