लातूर जिल्ह्यातील कोळनूर येथील प्रेमीयुगुलाने प्रेमाला घरातून होत असलेला विरोध सहन न झाल्याने नांदेडमधील मुखेड तालुक्यात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी दोघांचा मृतदेड झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पारस निवृत्ती नरोटे (वय २५) व धनश्री माधव चोले (वय २०) हे दोघे नांदेड येथे राहत होते. पारस पोलीस भरतीची तयारी करत होता तर धनश्री ही खासगी महाविद्यालयात द्वितीय वर्षांत तंत्रशिक्षण घेत होती. मागील काही दिवसांपासून दोघांचे प्रेम जुळले होते. दोघांच्याही घरी या प्रकरणाची कुणकुण लागताच त्यांच्या प्रेमाला परिवारातून मोठा विरोध होऊ लागला.

दीड महिन्यांपूर्वी धनश्री कोळनूर या गावी परतली होती. गुरुवारी पारसही एका लग्नानिमित्त गावात आला होता. त्यानंतर दोघांनी पारसचे आजोळ कासारवाडी गाठले. शुक्रवारी दोघांनी खुशाल देवकत्ते यांच्या शेतातील चिंचेच्या झाडावर गळफास घेत आत्महत्या केली.