बारामतीचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दादा साळुंखे यांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. 12 तारखेला उजनी धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या सोलापूर पुणे ब्रिजच्या खाली एक मृतदेह सापडला होता. या इसमाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली होती. हा मृतदेह दादा साळुंखे यांचाच असल्याची ओळख आता पटली आहे. घटनास्थळी टायरचे ठसेही दिसून आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दादा साळुंखे यांची हत्या करून त्यांचा मृतदेह या ठिकाणी आणून फेकला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हा मृतदेह जेव्हा पोलिसांना सापडला तेव्हा त्यावर असलेल्या शर्टच्या कॉलरवर Slikwera टेलर्स बारामती असा पत्ता पोलिसांना मिळाला. त्या अनुषंगानेच हा मृतदेह कोणाचा आहे याचा शोध पोलीस घेत होते. आता या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह बांधकाम व्यावसायिक दादा साळुंखे यांचा असल्याची माहिती समोर आली आहे.  दादा साळुंखे यांची हत्या करण्यामागे वैमनस्य होते की आणखी काही कारण? हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous builder dada salunke murder in pune
Show comments