सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका अद्याप जाहीर केली नाही. त्याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांनी मुंबई येथील अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. कापूस सोयाबीनचे दर कमी झाले असून शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे. सरकार जगूही देत नाही आणि मरुही देत नाही. सरकारला आमची प्रेतंच पाहायची असतील, तर अरबी समुद्रात पाहावी, असे रविकांत तुपकर म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईला जाण्यापूर्वी रविकांत तुपकर यांनी टी ९ मराठीशी संवाद साधला. तेव्हा बोलताना तुपकर म्हणाले, “अतिवृष्टीने सोयबीन आणि कापसाचे नुकसान झालं आहे, त्याची भरपाई अजून मिळाली नाही. सोयाबीनचे दर कोसळले असून, उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाही. कापूस आणि सोयाबीनचे दर कमी होत आहे. शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे. मागील एक महिन्यांपासून आंदोलन करत असून, सरकार दखल घेत नाही.”

हेही वाचा : कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा; सुधीर मुनगंटीवार म्हणाले…

“श्रेय आम्हाला देऊ नका पण…”

“सरकार निगरघठ्ठ झालं आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली, तर श्रेय आम्हाला मिळेल म्हणून सरकार जाणीवपूर्वक चर्चेला बोलवत नाही. श्रेय आम्हाला देऊ नका पण सोयाबीनला साडेआठ हजार रुपये आणि कापसाला १२ हजार रुपये भाव द्या. रब्बीचा हंगाम सुरु असल्याने दिवसाची वीज द्यावी,” अशी मागणी तुपकर यांनी केली.

हेही वाचा : “…तर तोंडाची थुंकी का उडवत होता”, दिशा सालियान प्रकरणावरून संजय राऊतांचा राणेंवर हल्लाबो

“..मग तरी सरकारला जाग येईल”

“सोयाबीन कापसाला भाव मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही. पोलिसांनी कितीही दबाव टाकला तरी सरकारशी दोन हात करण्यासाठी तयार आहे. सोयाबीन आणि कापसाला भाव नाही दिला तर, मंत्रालयाच्या खिडकीतून अरबी समुद्रात प्रेतं पडलेली सरकारला दिसतील. मग तरी सरकारला जाग येईल. सरकारला सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आला आहे. सरकारची मस्ती उतरवल्याशिवाय सोयाबीन कापूस उत्पादक थांबणार नाही,” असा इशाराही रविकांत तुपकर यांनी शिंदे सरकारला दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer dead body in arabian sea in mumbai ravikant tupkar warn shinde fadnavis government ssa
Show comments