बलिप्रतिपदेच्या दिवशी गायी-बैलांची कृतज्ञतापूर्वक औक्षण
वाडा: बळीराजासाठी वर्षभरातील सर्वात मोठा व आनंदाचा दिवाळी हा सण ओळखला जातो. शेतातील धान्य पिकून घरात आलेले असते. या वर्षी करोना विषाणूमुळे व परतीच्या पावसाने शेतकरी त्रस्त असला तरी त्याने आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतीने दिवाळी सण उत्साहात साजरा केला.
वाडा तालुक्यात प्रामुख्याने भात शेती केली जाते. सद्य येथील शेतकरी शेतीमध्ये आधुनिकीकरणाचा अधिक वापर करीत आहे. शेतीची नांगरणी, उखळणी यापूर्वी बैलजोडीच्या नांगराच्या मदतीने करीत असे. मात्र आता या अवजारांची जागा पॉवर टिलर, ट्रक्टर यांनी घेतली आहे.
येथील शेतकऱ्यांकडे पशुधन कमी झाले असले तरी, ज्या शेतकऱ्यांकडे गाय, बैल, म्हैश असे जे थोडेफार प्रमाणात पशुधन आहे. त्याची बलिप्रतिपदेच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने पुजा केली जाते. या दिवशी पशुधनाला आंघोळ घालून, त्याला रंगरंगोटी करून तसेच फुलांच्या माळांनी सजवून ओवाळणी करण्यात येते. नंतर गावातून मिरवणूक काढण्यात येते.
जुन्या पारंपरिक पद्धतीने दिवाळी सण साजरा करून येथील शेतकऱ्यांनी आजच्या कठिण परिस्थितीतही जुनी परंपरा कायम ठेवली आहे. घरात गोडधोड पदार्थ बनवून ते नातेवाईक, मित्रमंडळींना भेटी देण्याचीही परंपरा या वर्षी पुन्हा एकदा दिसून आली.