तालुक्यातील भांडगाव येथे अंगावर वीज पडून कचरू केशव खरमाळे (वय ६५) हे शेतकरी मृत्युमुखी पडले. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, सुपे वीज केंद्राकडून पारनेरकडे येणा-या वीजवाहिनीत वादळामुळे बिघाड झाला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तालुक्यातील अनेक गावे अंधारात होती.
 जामगाव भांडगाव रस्त्यावर खरमाळे यांचे शेत असून ते तेथेच कुटुंबीयांसह राहतात. दुपारी चारच्या सुमारास खरमाळे हे शेतात काम करीत होते. पावसाचे वातावरण तयार होऊन विजेचा कडकडाटही सुरू होता. प्रत्यक्षात चांगला पाऊसही सुरू झालेला नसतानाच वीज कोसळली व तिने खरमाळे यांचा वेध घेतला.  त्यात ते जागीच मृत्यू पावले.
वादळामुळे सुप्याहून येणा-या वाहीनीत दुपारी चारच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे पारनेर शहरासह तालुक्याच्या अनेक गावांतील वीज पुरवठा खंडित झाला. वीज वितरण कंपनीकडून या वाहीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले असून हे काम पूर्ण होईपर्यंत अनेक गावे अंधारातच होती.

Story img Loader