Ravikant Tupkar : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा आढावा आणि पक्ष संघटनेचा आढावा घेत निवडणुकीची रनणीती आखण्याचं काम नेत्यांकडून सुरु आहे. यातच सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. असे असतानाच आता शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झाले आहेत. राज्यातील सोयाबीन आणि कापसाच्या दरवाढीसाठी आंदोलनाचा इशारा देत राज्य सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी २३ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. “राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास २३ ऑगस्ट रोजी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात घुसणार आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रात्यक्षित मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर करुन दाखवणार”, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. ते ट्विव्ही ९ मराठीशी बोलत होते.

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
After soybeans price of cotton become big issue for farmers in Vidarbha
विदर्भात कापसाचे अर्थकारण विस्‍कळीत
Mahesh Kharade warns of agitation as Rajarambapu Sugar Factorys Rs 3200 installment is invalid
राजारामबापू’च्या ऊसदरास शेतकरी संघटनांचा विरोध, ‘स्वाभिमानी’चा आंदोलनाचा इशारा

हेही वाचा : Vijay Wadettivar : “सरकारी तिजोरीतून महिलांना पैसे देऊन स्वत:ची पाठ थोपटणारे आता…”; बदलापूर प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचं शिंदे सरकारवर टीकास्र!

रविकांत तुपकर काय म्हणाले?

“महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. आमची सरकारकडे मागणी आहे की, निवडणुकीच्या आधी पुढच्या सोयाबीन आणि कापसाच्या दरासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घ्यावा. सोयाबीनला ९ हजार आणि कापसाला १२ हजार रुपये दर द्यावा, तसेच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात यावं, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. याबरोबरच मोसंबी आणि संत्र्यांच्या बागांच्या गळतीची पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच धान पिकाला २ हजार रुपये बोनस देण्यात यावे, यासह आदी मागण्या घेऊन आम्ही राज्य सरकारला दोन ते तीन दिवसांचा अवधी देत आहोत. मात्र, राज्य सरकारने याबाबत जर कोणताही निर्णय घेतला नाही तर आम्ही २३ ऑगस्ट रोजी वर्षा बंगल्यात घुसणार आणि शेतकरी आत्महत्याच प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर करुन दाखवणार, मग आमच्या जीवाला काही झालं तर त्यासाठी मुख्यमंत्री जबाबदार असतील”, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

त्यांनी पुढं म्हटलं की, “आम्ही करत असलेलं आंदोलन हे कुठल्या संघटनेचं किंवा पक्षाच नाही, हे आंदोलन शेतकऱ्यांचं आहे. पक्षाचे झेंडे बाजूला ठेऊन शेतकरी आणि शेतमजूर आम्ही सर्वजण एकत्र येऊन आंदोलनाचा नारा दिलेला आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन करणार आहोत. मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्षा बंगल्यावर येणार आहोत. येत्या काळात आम्ही महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन उभं करणार आहोत”, असंही रविकांत तुपकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Story img Loader