अतिरिक्त संपादित जमिनी परत करण्याची मागणी
अलिबाग तालुक्यातील धेरंड , शहापूर परीसरात प्रस्ताटवीत टाटाच्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी अतिरिक्तण संपादीत केलेली जमीन शेतकरयांना परत करावी या मागणीसाठी आज परीसरातील शेतकऱ्यांनी जिल्हा धिकारी कार्यालयावर धडक दिली . शेकडो शेतकऱ्यांनी रांगेत उभे राहून आपले मागणीपत्र जिल्हा धिकारी यांना सादर केले. यामध्येड महिलांची संख्याही लक्षणीय होती .
सकाळी ११ च्या सुमारास शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल होण्यास सुरवात झाली. सुरवातीला त्यांनी कार्यालयाच्या आवारात असणारया देवीच्या मंदिरात बठक घेतली. टाटा पॉवरच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी एमआयडीसीने अतिरीक्त जागा संपादित केली आहे. ही अतिरीक्त संपादित केलेली जागा शेतकऱ्यांना परत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासाठी शेकडो शेतकरयांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नोंदणी शाखेत रांगेत उभे राहून आपली मागणीपत्रे जमा केली.
अलिबाग तालुक्यातील शहापुर धेरंड परिसरात टाटा पॉवरचा १६०० मेगावॅटचा औष्णीक वीज प्रकल्प येऊ घातला आहे. या प्रकल्पासाठी ३८७ हेक्टर शेत जमिन संपादीत करण्यात आली आहे. एमएसआडीसी कायद्यानुसार प्रकल्पासाठी भुसंपादन प्रक्रीया केली असून प्रकल्पासाठी लागणारया एकूण जमिनीपकी ७० टक्के जागा तडजोडीने संपादीत करण्यात तर उर्वरीत ३० टक्के जागा सक्तीने संपादीत करण्यात आल्या आहेत. भुसंपादन प्रक्रीया पुर्ण झाली असली तरी अद्याप प्रकल्पाचे काम सुरु झालेले नाही. या प्रकल्पासाठी नेमकी किती जागा लागते याची निश्चिती होत नव्हती.
अखेर रायगड जिल्हाधिकारी यांनी महा निर्मितीच्या कार्यकारी संचालकांना पत्र देऊन १६०० मेगावॅटच्या वीज प्रकल्पासाठी नियमानुसार किती हेक्टर जागा लागते यासंदर्भातील अहवाल मागविला होता. तो जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. केंद्रीय विद्यूत प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार १६०० मेगावॅट प्रकल्पासाठी ३०० हेक्टर येवढीच जागा आवश्यक असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात टाटा पॉवरच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी ३८७ हेक्टर भुसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेपेक्षा ८७ हेक्टर अधिक जागा संपादीत झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी संपादीत झालेली अतिरीक्त जमिन शेतकऱ्यांना परत मिळावी अशी मागणी आता श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने आज करण्यात आली.