पावसाअभावी वाया गेलेली पिके आणि आर्थिक विवंचनेमुळे पाटखळ (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (दि. १३) सकाळी ही घटना उघडकीस आली. भारत अप्पा गडदे (वय ६०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारत गडदे यांची सहा एकर शेतजमीन आहे. ते आर्थिक अडचणीत होते. त्यातच पावसाअभावी पिके वाया गेली. त्यामुळे ते निराश होते. यातूनच १२ नोव्हेंबर रोजी रात्री पाटखळ- आंधळगाव रस्त्यावरील चौगुले – आलदर वस्तीवरील झाडास धोतराने गळफास घेऊन आत्महत्या केली. गडदे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, येथील ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार अप्पासाहेब समिंदर यांनी गडदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन माहिती घेतली.