अलिबाग: प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरून राजकारण तापले असतांनाच मुरुड आणि रोहा तालुक्यातील प्रस्तावित बल्क ड्रग पार्क विरोधात शेतकऱ्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पासाठी जागा देणार नसल्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आता चार आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

सकाळी सव्वा दहाच्या सुमारास चितामणराव केळकर विद्यालयापासून मोर्चाला सुरवात झाली. सुमारे दोन हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. शेतकरीभवन, बालाजी नाका, मारुती नाका मार्गे मोर्चा जनरल अरुणकुमार वैद्य विद्यालयासमोर दाखल झाला. या ठिकाणी पोलीसांनी मोर्चा अडवला. मोर्चाचे छोटेखानी सभेत रुपांतर करण्यात आले. प्रकल्प विरोधी शेतकरी समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी मोर्चाला संबोधीत केले. यानंतर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश मोहीते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले.

हेही वाचा >>> विश्लेषण: गुजरात सरकार ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत, म्हणजे नेमकं काय होणार? त्याला विरोध का होतोय?

या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी सुरवातीपासूनच विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनींबरोबरच राहती घरेही, वाड्या वस्त्याही संपादीत केल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बेरोजगारी बरोबरच बेघर होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध असल्याचे अँड. महेश मोहीते यांनी सांगितले. त्याच बरोबर जिल्ह्यात यापुर्वीही एमआयडीसीच्या मार्फत अनेक ठिकाणी भुसंपदान करण्यात आले आहे. पण त्याठिकाणी प्रकल्प आलेले नाहीत. शेती गेली आणि प्रकल्प आले नाही, रोजगार मिळाले नाहीत आणि लोक देशोधडीला लागले त्यामुळे या कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पासाठी जागा देणार नसल्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवला.

रोहा तालुक्यातील भुसंपादन क्षेत्रात बड्यानेत्यांनी जागा जमिनी खरेदी करून त्यामध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध असूनही प्रकल्प पुढे रेटला जात असल्याचा दावा महेश मोहीते यांनी केला. प्रकल्प परीसरात कोणी किती जागांची खरेदी केली आहे. याची यादी माझ्याकडे आहे. लवकरच ती नावे जाहीर करणार असल्याचेही यावेळी सांगीतले.  या प्रकल्प विरोधी आंदोलनाचे मी सुरवातीपासून नेतृत्व केले आहे. शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची वेळोवेळी भेट घेतली आहे. त्यामुळे सत्ता बदल झाला म्हणून आता भुमिका बदलणे योग्य ठरणार नाही. मी कालही शेतकऱ्यांसोबत होतो उद्याही राहीन, पदाचा राजीनामा दिला आहे. वेळ पडली तर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची माझी तयारी आहे. पण शेतकऱ्यांची साथ सोडणार नाही अशी जाहीर भुमिका मोहीते यांनी यावेळी मांडली.