लोकांनी मला शेतक ऱ्याचे पोरगे म्हणून शिवारातून संसदेत पाठवले आहे. ही लढाई लोकांनी दिलेल्या पैशातून लढलो. माझा विजय हा लोकशाहीत अपवाद न राहता तो नियम बनावा, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी येथील अक्षर प्रकाशन व निर्धार संस्थेच्या वतीने स्वत लिहिलेल्या ‘शिवार ते संसद’ या पुस्तकावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
खासदार शेट्टी म्हणाले, जगात केवळ शेतकरी हा असा घटक आहे, की ज्याला आपल्या उत्पादनाचा दर ठरविण्याचा हक्क नाही. त्यामुळे आजवर शेतक ऱ्यांची व्यापारी धोरण ठरविणाऱ्या यंत्रणेने पिळवणूक केली आहे. शेतक ऱ्यांची या लुटारूंच्या टोळीपासून मुक्तता करण्यासाठी आम्ही शिवारातच पिकांची किंमत ठरविण्यासाठी आमची लढाई आहे. याच्या जोरावरच मी शिवारातून संसदेत गेलो आहे. आता मला पुन्हा शिवारात पाठविण्याची भाषा होत आहे, पण मला पुन्हा शिवारात पाठविणे विरोधकांना शक्य होणार नाही.
ते पुढे म्हणाले, आजवरच्या चळवळीतील अनुभव कथन करण्याच्या विचारातून ‘शिवार ते संसद’ या पुस्तकाची निर्मिती झाली. ऊस दरासाठी १९९५ पासून चळवळ उभारली. माझा लढा पाहून शेतक ऱ्यांनी बळ दिले. त्यामुळे पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो. २००४ मध्ये साखर सम्राटांच्या विरोधात शड्डू टोकून उभा राहिलो आणि तेथेही विजयी झालो. पुढे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शेतक ऱ्यांनी विजयी केले. निवडणुकीत अवाढव्य खर्च कशासाठी व्हावा. मी स्वाभिमानी व स्वावलंबी जीवनाचा धडा देतो. तेव्हा लोकांना दारू व जेवण देऊन त्यांचे मत मी घेणार नाही. जनसेवेसाठी मी माझा वेळ व बुद्धी खर्च करतो. त्यामुळे त्यांनी मला त्यांचे पैसे देऊन निवडून द्यावे, अशी माझी भावना आहे. मी जन्माला आलो त्या वेळी माझे हात स्वच्छ होते. जीवनाच्या शेवटीही ते स्वच्छच असणार असा विश्वास मी जनतेला दिला आहे. त्यानुसार माझे वर्तन आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर देशपांडे यांनी केले. तर रवींद्र जोशी यांच्या हस्ते खासदार शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा