सांगली : शेतकर्यांच्या हक्कासाठी आपण भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये इस्लामपूरमध्ये केली.
हेही वाचा >>> शरद पवारांच्या भूमिकेविषयी शंका? अशोक चव्हाण म्हणाले, “लोकांमध्ये संभ्रम…”
तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री. राव मंगळवारी वाटेगाव (ता.वाळवा) येथे लोकशाहीर अण्णा भाउ साठे यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी साखराळे येथील श्री. पाटील यांच्या घरी भेट दिली. तसेच पाटलांच्या घरी भोजनाचा आस्वादही घेतला. तत्पुर्वी त्यांनी श्री.राव यांच्या भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा केली. राव यांनी त्यांचे बीआरएसमध्ये स्वागत केले.
हेही वाचा >>> “…याचा मक्ता त्यांना कोणी दिला?” अजित पवारांनी राज ठाकरेंना खडसावलं
शेतकर्याचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील अन्य राजकीय पक्ष असमर्थ ठरत आहेत. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणताच राजकीय पक्ष मनापासून काम करीत नाही. यामुळे शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण बीआरएसमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.