सोलापूर : Barsu Refinery Project कोकणातील बारसू पूरकल्पासाठी जमिनी द्यायला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना सरकारने बळाचा वापर करून, कितीही गोळ्या चालविल्या तरीही शेतकरी मागे हटणार नाही, आसा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापुरात राजू शेट्टी यांनी बारसू प्रकल्प प्रश्नावर प्रसार माध्यमांशी भाष्य केले. शेतकऱ्यांचा विरोध डावलून बळाचा वापर करून दंडेलशाहीने सरकार प्रकल्प उभारल्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान होणार नाही आणि सरकारचाही सन्मान होणार नाही. उलट यातून संघर्ष आणखी पेटणार आहे. सरकारनेच प्रकल्प रद्द करावा. यातच सरकार आणि शेतकऱ्यांचे हित आहे, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.

राज्यात आणि देशात शेतकरी जेव्हा जेव्हा रस्त्यावर येऊन आपल्या प्रश्नांवर लढा उभारतो, तेव्हा शेतकऱ्यांचीच सरशी झाली आहे. कोकणातही यापूर्वी नाणार व इतर प्रकल्पांच्या प्रश्नावर हाच अनुभव  आला आहे. बारसू प्रकल्पाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले शेतकरी हे काही भाडोत्री माणसे नाहीत. ९० टक्के शेतकरी आपल्या जमिनी द्यायला अजिबात तयार नाहीत. कारण त्यांच्या शेतीचा आणि उपजीविकेचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांसह त्यांच्या घरातील महिलासुध्दा रस्त्यावर उतरल्या  आहेत. त्यांच्या भावनांशी सरकारने खेळ खेळ नये, असे शेट्टी यांनी सुनावले.