Fastag Compulsory From 1st April 2025 In Maharashtra : महायुती सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, या निर्णयानुसार आता राज्यातील सर्व वाहनांसाठी एक एप्रिल २०२५ पासून, फास्ट टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून या निर्णयाची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णयावर वाहनधारकांमधून काय प्रतिक्रिया येणार आणि याचा टोल नाके, आणि वाहतूक कोंडीवर कसा परिणाम होणार हे पाहावे लागणार आहे.

निर्णयाचे फायदे

फास्ट टॅग च्या माध्यमातून टोल वसुली झाल्यास यामध्ये अधिक सूसुत्रता, पारदर्शकता येणार आहे. टोल नाक्यांवर वाहनांचा खोळंबा कमी होणार आहे. यातून वेळेची, इंधनाची बचत होणार आहे. फास्ट-टॅग शिवाय अन्य कोणत्याही माध्यमातून टोल भरायचा झाल्यास किंवा फास्ट टॅग सुरु नसेल किंवा टॅगशिवाय वाहनाने फास्ट टॅगच्या मार्गिकेत प्रवेश केल्यास दुप्पट पथकर भरावा लागणार आहे. राज्यात सद्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १३ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ९ रस्ते प्रकल्पांवर टोल वसुली सुरु आहे. या ठिकाणी तसेच भविष्यात टोल वसुल करावा लागणाऱ्या प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे.

Dispute over setting up kite stall two former BJP corporators clashed
पतंगाचा स्टॉल लावण्यावरून वाद, भाजपच्या दोन माजी नगरसेविका आपसात भिडल्या
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Who are you to stop construction of Sambhaji Maharajs statue says Shivendrasinh Raje
संभाजी महाराजांचा पुतळा उभारणी रोखणारे तुम्ही कोण- शिवेंद्रसिंहराजे
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांत ‘या’ सुविधा देणे बंधनकारक, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
266 people died in road accidents in Raigad in year
रायगडमध्ये वर्षभरात रस्ते अपघातात २६६ जणांचा मृत्यू
HMPV Virus Nagpur Maharashtra Case Updates
HMPV in Nagpur: HMPV चा अधिक धोका कुणाला? नागपूरमध्ये दोन रुग्ण आढळल्यानंतर एम्सच्या संचालकांची महत्त्वाची माहिती
supriya sule dhananjay munde
Dhananjay Munde Controversy: “मला अजूनही तो दिवस आठवतो, जेव्हा…”, सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीसांना केलं आवाहन!
dgp Rashmi Shukla
रश्मी शुक्ला यांना महासंचालक पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांकडून का होतेय? झारखंड पोलीस महासंचालकांचा संदर्भ काय?

केंद्र सरकारकडून २०२१ पासून अंमलबजावणी

केंद्र सरकारने सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य केले होते. सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढत, १ जानेवारी २०२१ पासून सर्वचार चाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य करण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला होता. विशेष म्हणजे हा नियम जुन्या म्हणजेच ज्यांची विक्री १ डिसेंबर २०१७ च्या अगोदर झालेल्या वाहनांसाह M व N कॅटेगिरीतील वाहनांना देखील लागू करण्यात आला होता. पण याची अनेक राज्यात पूर्णपणे अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

केंद्रीय मोटार मोटार वाहन नियम १९८९ नुसार १ डिसेंबर २०१७ नंतर खरेदी करण्यात आलेल्या सर्व चारचाकी वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य केले गेले होते. वाहन निर्माता किंवा डीलरद्वारे ‘फास्ट टॅग’चा पुरवठा केला जात होता. तसेच ‘फास्ट टॅग’ लावलेल्या वाहनांचेच फिटनेस प्रमाणपत्राचे रिन्युअल केवळ करण्याचा आदेश दिला होता. दरम्यान नॅशनल परमीट वाहनांसाठी १ ऑक्टोबर २०१९ पासूनच ‘फास्ट टॅग’ बंधनकारक करण्यात आले होते.

हे वाचा : Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य

काय आहे फास्ट टॅग?

फास्ट टॅग एक स्टिकर किंवा टॅग असते जे सहसा कारच्या विंडस्क्रीनवर चिकटवले जाते. टोल शुल्क आकारण्यासाठी टोल नाक्यांवर बसवलेल्या स्कॅनरने ते स्कॅन केले जाते. या स्कॅनरद्वारे शुल्क आकारणीसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. एकदा कारने टोल प्लाझा ओलांडला की, आवश्यक टोलची रक्कम बँक खात्यातून किंवा FASTag शी जोडलेल्या प्रीपेड वॉलमधून आपोआप कापली जाते. यामुळे वाहनांना टोल नाक्यावर थांबण्याचीही आवश्यकता नसते. एकदा वाहनाने टोल नाका ओलांडला की, मालकाला टोल शुल्क आकारल्याचा एसएमएस अलर्ट त्याच्या मोबाइलवर मिळतो.

Story img Loader