वर्ध्यात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नराधम बापाने १७ वर्षीय पोटच्या मुलीवर सलग तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्याच्या अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरगाव आलोडा या गावात घडली.

बोरगावात आरोपी बापाने आपल्या पोटच्या १७ वर्षीय मुलीवर सलग तीन वर्षे लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही, तर आरोपी मुलीवरील लैंगिक अत्याचाराची माहिती बाहेर जाऊ नये म्हणून पत्नीलाही मारहाण करायचा. मात्र, सततचा अत्याचार असह्य झालेल्या पीडित मुलीने अखेर हा सर्व प्रकार आपल्या शिक्षिकेला सांगितला. त्यामुळे हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले.

हेही वाचा : मुंबई : नऊ वर्षाच्या मुलीवर तिघांचा बलात्कार ; पोलिसांकडून आरोपी अटकेत

पोलिसांनी आरोपी बापाला अटक केलं आहे. त्याच्याविरोधात पाक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुनिल गाडे करीत आहेत.

Story img Loader