वडिलांच्या आत्महत्येच्या चिठ्ठीमुळे मुलाच्या हत्येचा शोध लागल्याची धक्कादायक घटना जळगावातील धरणगाव एरंडोल तालुक्यातून समोर आली आहे. हितेश विठ्ठल पाटील (वय २२, रा. भोरखेडा) असं या रीलस्टार मुलाचं नाव असून त्याची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. मात्र, त्याच्या वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर या हत्येचा छडा लागला आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२५ फेब्रुवारी रोजी विठ्ठल पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते माजी सैनिक होते. त्यांच्या आत्महत्येचा तपास सुरू असताना त्यांच्या शर्टाच्या खिशात सुसाईड नोट सापडली. यामध्ये “माझ्या मुलाचा खून केला असून, त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आला आहे”, असे लिहिले होते. ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली.

धरणाजवळ मृतदेह सापडला

सुसाईड नोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता, गुरुवारी दुपारी भोरखेडा गावाजवळील धरण परिसरात विठ्ठल पाटील यांच्या मुलाचा म्हणजेच विकी पाटीलचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढला. यावेळी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. दरम्यान विठ्ठल पाटील यांनी मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या का केली? याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

वडिलांच्या सुसाईड नोटने या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर, धरणगाव पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांनी पाहणी केली असून एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलीस काय म्हणाले?

तसंच, विठ्ठल सखाराम पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी तपास सुरू असताना त्यांच्या खिशात सुसाईड नोट मिळाली. त्यात त्यांनी त्याच्या मुलाच्या नावाचा उल्लेख करत, त्याच्या मरणाला मी जबाबदार आहे असं म्हटलं होतं. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता मृतदेह सापडला. तो हितेश पाटीलचा मृतदेह असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे, अशी प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी दिली.