सांगली : सहा फूट लांब आणि तीन किलो जटांचे ओझे गेली चौदा वर्षे डोकीवर घेऊन वावरत असणाऱ्या महिलेने यंदाचा जागतिक महिला दिन अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या प्रयत्नाने जटामुक्त होत अनैख्या पध्दतीने साजरा केला. बेडग (ता. मिरज) येथील सुवर्णा पोपट नांगरे ही महिला मोलमजुरी करून आपल्या आईसोबत राहते. देवीचा आदेश म्हणून तिच्या डोक्यामध्ये चौदा वर्षांपूर्वी जट आली. चौदा वर्षात ती जट सहा फूट लांबीची, तीन किलो वजनाची झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> “साताऱ्यातून उदयनराजेंनाच उमेदवारी मिळावी”, चित्रा वाघ यांची इच्छा; म्हणाल्या, “बावनकुळे याबाबत सकारात्मक…”

सुवर्णाची जट काढण्याबाबत तिची आई लिलाताई नांगरे, शिक्षिका सरिता माने, अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, त्रिशला शहा, आशा धनाले यांनी मागील चार दिवसांपूर्वी तिचे समुपदेशन करत जटा निर्मुलनास राजी केले. शनिवारी अंनिसच्या कार्यकर्त्या आशा धनाले, त्रिशला शहा, डॉ. सविता अक्कोळे यांनी सुवर्णाच्या जटा कापून या अघोरी अंधश्रद्धेतून तिला मुक्त केले. चौदा वर्षांपूर्वीची जुनाट जट काढल्यानंतर सुवर्णाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. हे हास्य बघून अंनिसचे कार्यकर्ते ही आनंदीत झाले. याप्रसंगी सरिता माने यांनी सुवर्णास साडी चोळी देऊन तिचा सन्मान केला.