सांगली : ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत महिला सरपंचाला महिला सदस्यांकडून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रकार चिंचणी मंगरूळ (ता. खानापूर) या गावी बुधवारी घडला. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात महिला सदस्याविरूध्द सरपंच महिलेने रात्री उशिरा तक्रार दाखल केली आहे. याबाबत माहिती अशी, चिंचणी मंगरूळ या गावी बुधवारी मासिक सभा होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “राज ठाकरे मोदींच्या गॅरंटीवर देशाला पुढे नेण्यासाठी…”, बावनकुळेंचं सूचक वक्तव्य; मनसेच्या जागांच्या कथित मागणीवरही भाष्य

सरपंच रेवती भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या मासिक सभेस ग्रामविस्तार अधिकारीही उपस्थित होेते. गेले काही दिवस सरपंच मनमानी कारभार करत असल्याचा आरोप काही सदस्यांकडून होत होता. यामुळे काही  सदस्य मासिक सभेस अनुपस्थित राहत होते. बुधवारच्या बैठकीवेळी प्रभागातील पाणी का बंद आहे या कारणावरून सरपंच श्रीमती भोसले आणि सदस्या शुभांगी सुर्वे यांच्यात वाद झाला. या वादात श्रीमती सुर्वे यांनी सरपंच महिलेचे ओढाओढीत बोट मोडले. सरपंचांना तुझी पात्रता नसताना मी तुला सरपंच केले तेच माझं चुकले. असे म्हणत वैयक्तिक पातळीवर जाउन टीकाटिपणी केली. तसेच जातीवाचक बोलून अवमान केला असल्याची तक्रार विटा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दाखल करण्यात आली. यानुसार श्रीमती सुर्वे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female sarpanch beaten by female members in gram panchayat monthly meeting zws
Show comments