सावंतवाडीचा फेस्टिव्हल ऑफ मोती तलाव येत्या २९ एप्रिल ते २ मे या कालावधीत होत आहे. या वेळी विविध उत्सवांसोबत करवंटी, बांबूंपासून विविध वस्तू निर्माण करणारे स्टॉलदेखील असतील. या फ्रूट अॅण्ड फ्लॉवर फेस्टिव्हलमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा विविधता असेल, असे सांगण्यात आले. या आयोजनासंदर्भात लोकमान्य टिळक सभागृहात एक बैठक झाली. या वेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, सजग विचार नागरी मंचचे सचिन देसाई आदी उपस्थित होते. कॅन्सरवर सेवाभावीवृत्तीने कार्य करणारा सौरभ निंबकर या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. हा तरुण रेल्वे स्टेशनवर गिटारवादन करून त्यामधून मिळणारी रक्कम कॅन्सरपीडितांसाठी खर्च करतो, अशी माहिती देण्यात आली. गुजरातमधील भुजोडी या विणकर समाजाच्या स्टॉलचा या महोत्सवात सहभाग आहे. बांबूपासून बनविलेल्या ज्वेलरी, सल्फरविरहित साखरेचा मधुर शुगर स्टॉल या महोत्सवात असतील. आयटीआय मुंबईच्या नारळाच्या करवंटीपासून चहाचा कप, करवंटीपासून बनविलेल्या विविध वस्तूंचा स्टॉल, स्थानिक फ्रूट सॅलेड स्टॉल, नंदनवन फ्रूट स्टॉल, कोल्हापूर येथील कणेरी मठाचा स्टॉल, फळसंशोधन, वनविभाग स्टॉल असेल. या महोत्सवात नगर परिषद फ्रूट अॅण्ड फ्लॉवर फेस्टिव्हलचा ट्रेडमार्क रजिस्टर करण्यात येणार आहे.
‘फेस्टिव्हल ऑफ मोती तलाव’ एप्रिलमध्ये
सावंतवाडीचा फेस्टिव्हल ऑफ मोती तलाव येत्या २९ एप्रिल ते २ मे या कालावधीत होत आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 29-03-2016 at 01:04 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Festival of moti talav in april