राज्यमंत्री उदय सामंत आणि विद्यमान खासदार निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज (शनिवारी) हाणामारीची घटना घडली. काँग्रेसभवनात आघाडीची समन्वय बैठक सुरु असताना एका क्षुल्लक कारणावरून दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये वाद झाला. याचे पर्यवसन हाणामारीमध्ये झाले.
विद्यमान खासदार निलेश हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून यंदा पुन्हा एकवार कॉंग्रेस आघाडीतर्फे उभे राहिले असून त्यांची मुख्य लढत महायुतीचे उमेदवार आमदार विनायक राऊत यांच्याशी आहे. कॉंग्रेस आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस हा मुख्य मित्र पक्ष असून गेल्या काही वर्षांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये या पक्षाने चांगले बस्तान बसवले आहे. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, रत्नाागिरी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर या तिघांनाही राणेंनी दुखावून ठेवले आहे. राऊत यांच्याशी सामंतांनी बंद खोलीत गुप्त चर्चा केल्याचा आरोप गेल्या महिन्यात खासदार निलेश यांनी पत्रकार परिषदेत केल्याने  सामंतांसह त्यांचे कार्यकर्ते अतिशय दुखावले. अखेर नारायण राणे यांनाच त्यांची भेट घेण्यासाठी धाव घ्यावी लागली. त्यामुळे सामंत हे निलेश यांच्या सभांना हजेरी लावत असले तरी जाधव आणि केसरकर फिरकलेले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात तर संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस संपवण्याच्या दिशेने राणे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची फळेही त्यांना भोगावी लागत आहेत. पक्षाने काढले तरी बेहत्तर, पण निलेश यांचा प्रचार करणार नाही, अशा निकराच्या भूमिकेपर्यंत राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा