शहरात बुधवारी सकाळी दोन गटांत अचानक मारामारी झाली. दोन्ही गट रस्त्यावर उतरले, त्यांनी परस्परांवर दगडफेक केल्याने चांगलीच पळापळ होऊन व्यापा-यांनी दुकाने पटापट बंद केली. मात्र काही वेळातच पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील व निरीक्षक प्रताप इंगळे पथकासह घटनास्थळी आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी जमावावर जोरदार लाठीमार करून स्थिती आटोक्यात आणली.
आज सकाळी अकरा वाजता शहरातील मेन रोडवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसमोर दोन गट हातामध्ये गज, काठय़ा घेऊन समोरासमोर आले. अचानक दगडफेक सुरू झाली. त्या वेळी एकच पळापळ सुरू झाली. घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण होते. दुपारी चारनंतर पुन्हा व्यापा-यांनी दुकाने उघडली व सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.

Story img Loader