भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारपरिषदेत बोलताना एक मोठं विधान केल्याचं समोर आलं आहे. राज्यातील राजकारणात सध्या सरकारमधून पहिल्यांदा बाहेर कोण पडणार आणि भाजपाबरोबर सरकार कोण करणार याची चढाओढ सुरू आहे. असं पाटील म्हणाले आहेत. याचबरोर, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ मध्ये राज्यातील सरकार स्थापनेबाबत केलेल्या विधानावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी ऑफर दिली होती असं काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलेलं आहे, असं माध्यम प्रतिनिधीने सांगितल्यावर चंद्रकांत पाटील यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “हे सांगायला पवारांना इतका वेळ का लागला? आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दोघेही इतके मोठे नेते आहेत, त्यांच्यात झालेली चर्चा ही आपल्या सारख्यांना कळणच अवघड आहे. पण, मी म्हटलेलं आहे की अशी कुठली ऑफर मिळाली असती, तर ती ऑफर नाकारण्या इतका राजकीय असमंजसपणा शरद पवारांचा नाही. शरद पवारांचा इतिहास काय खरं बोलण्याचा आहे असं नाही. परंतु यावर मी टिप्पणी कशाला करायची. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात काय बोलणं झालंय, शरद पवार आणि अजित पवार यांचं काय बोलणं झालं? अजित पवार आणि अमित शहा यांचं काय झालं? अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं काय झालं? हे सांगण्या इतका मी मोठा नेता नाही आणि एवढ्या जाहीरपणे सांगण्या इतका अपरिपक्व देखील नाही.”

sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Amit Thackeray Eknath shinde devendra fadnavis
Amit Thackeray : भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा? शेलारांच्या वक्तव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेची वेगळी भूमिका; म्हणाले, “सरवणकरांना डावलणं…”
Sujay Vikhe Patil Jayashree thorat Sangamner tension
Sangamner News: बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; सुजय विखेंच्या सभेनंतर संगमनेरमध्ये तणाव
Senior Maharashtra minister Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar: लोकसभेनंतर भाजपाने रणनीतीत ‘हा’ महत्त्वाचा बदल केला, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “RSS ने लोकसभेवेळी…”
A conflict started between Dr Sujay Vikhe and Dr Jayashree Thorat
थोरात-विखे तिसऱ्या पिढीतील संघर्षाची झाली नांदी..; डॉ सुजय विखे व डॉ. जयश्री थोरात आमने सामने
Hindi language is compulsory from first standard in Maharashtra
हिंदी भाषा सक्तीचा हा कसला दुराग्रह?
Jayashree Thorat On Sujay Vikhe Patil:
Jayashree Thorat : “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर..”, बाळासाहेब थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना इशारा

याचबरोबर, “राज्याच्या राजकारणात आता सरकारमधून पहिल्यांदा कोण बाहेर पडायचं आणि भाजपाबरोबर सरकार कोणी करायचं, याची चढाओढ सुरू झाली आहे. मला असं वाटतयं की मागील दोवस जे चाललंय, त्या चढाओढीचाच तो परिणामा आहे. कोण बाहेर पडणार आणि भाजपा बरोबर सरकार कोण करणार? याची चढाओढ चाललेली आहे आणि या चढाओढीत मागील दोन दिवसातील घटना या पुरक आहेत.” असंही चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.

“…त्यामुळे या अधिवेशनात लोकांचे प्रश्न मार्गी लावणे हा हेतू नव्हता”

तसेच, “मागील २६ महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा जो इतिहास आहे, अडकवण्याचा इतिहास आहे. भाजपाच्या आमदारांना निधी द्यायचा नाही, त्यांच्या आमदरांना द्यायचा असा इतिहास आहे. महाराष्ट्रातील सामान्य माणासांच्या प्रश्नांच्याबाबतीत दुर्लक्ष करण्याचा जो इतिहास आहे तो पाहता, केंद्रीय नेतृत्व ठरवलेल परंतु यांच्यापैकी कोणाबरोबरही जाण्याची आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची काही इच्छा नाही.” असंही यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.