संजय राऊत यांना एक धमकी आली. ही धमकी ठार करण्याची होती. सुनील राऊत यांनी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली होती. मी तेव्हाच बोललो होतो की मच्छराला मारण्यासाठी धमकीची काहीच गरज नाही. मात्र संजय राऊत हा ४२० असल्याने सगळ्याच बाबतीत खोटारडा आणि भंपक माणूस आहे. धमकी प्रकरणात मयूर शिंदेला अटक केली आहे. हा मयूर शिंदे कोण? सुनील राऊत यांचाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे आता संजय राऊतांवर ४२० ची तक्रार दाखल झाली पाहिजे अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.
संजय राऊत आणि त्यांचा भाऊ सुनील राऊत एवढे भामटे आहे की स्वतःच्याच कार्यकर्त्याकडून स्वतःला धमकी देण्याचा प्रकार यांनी केला आहे. हे असं खोटं बोलूनच पोलीस संरक्षण घेऊन फिरतात. संजय राजाराम राऊत दाऊदपासून सगळ्यांची भाषा करतो. त्यामुळेच मी त्याला भांडुपचा देवानंद म्हणतो. कारण खोटं बोलणं आणि गद्दारी करणं यापेक्षा हा काही करत नाही. कार्यकर्त्याकडूनच धमकीचा फोन करायला लावायची, धोका आहे सांगायचं आणि जीवाला धोका आहे सांगायचं. त्यानंतर गृहमंत्री फडणवीसांवर टीका करायची हे याचं धोरण आहे असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- संजय राऊत शकुनी मामा, राष्ट्रवादीत भांडणे लावली; भाजपचे आमदार नितेश राणे यांची टीका
संजय राऊत हा लवकरच तुम्हाला तुरुंगात दिसणार आहे. कैदी नंबर ८९५९ चा गणवेश घालून बाथरुमसाठी भांडताना दिसणार आहे. मी मागणी करतो की असल्या लोकांचं संरक्षण काढून टाका. पत्रकार मित्रांनाही सांगेन की याच्या बाजूने बातम्या देताना थोडी अधिकची माहिती घेतली पाहिजे. धमकी देणारा कोण आहे? याची माहिती घ्यायला हवी. संजय राऊत स्वतःच्या मालकाचा झाला नाही तो तुमचा आणि आमचा काय होणार? असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा “संजय राऊत धमकी प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी करा, कारण…”, नितेश राणेंची मागणी
मयुर शिंदे तुझा कार्यकर्ता आहे का? याचं उत्तर आधी महाराष्ट्राला दे. त्यानंतर तुझं इतर काही बोलण्यासाठी तोंड उघड असाही इशारा नितेश राणेंनी दिला आहे. मराठी माणसाला हिंदीत बोलायला सांगायचं आणि देशभरात तो कॉल रेकॉर्ड करुन व्हायरल करायचा. मी महाराष्ट्र पोलिसांना आणि सरकारला विनंती करतो की संजय राऊतसारख्या खोटारड्या माणसाची सुरक्षा काढावी आणि त्याच्याविरोधात ४२० ची तक्रार दाखल करा अशी मागणीही नितेश राणेंनी केली आहे.