वाई: छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमच्या सभेत औरंगजेबाचे छायाचित्र झळकवणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. औरंगजेबाने त्याच्या कारकिर्दीमध्ये लाखो हिंदूंची कत्तल केली. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांची मोठी तोडफोड केली. अशा औरंगजेबाचे छायाचित्र झळकवून जर त्याचे कोणी उदात्तीकरण करत असेल तर त्याचा मी निषेध करतो. अशी छायाचित्रे झळकवणाऱ्यांच्यावर ताबडतोब देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी मी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “खेडमधील सभेचा शिवसेनेला नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला…” चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या जुलमी कारकिर्दीच्या विरोधात मोठा लढा उभारला होता. येथील एका सभेत असे एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे छायाचित्र झळकवणे हे योग्य नाही. ज्यांनी असे प्रकार केले असतील त्यांनी महाराष्ट्र सोडून इतरत्र निघून जावे. महाराष्ट्राची परंपरा ही पुरोगामी सर्वधर्म समभावाची आहे. तिथे असे प्रकार होणार असतील, तर हे बिलकुल खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छायाचित्रे झळकवणाऱ्यांच्यावर ताबडतोब देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: File charges against pictures aurangzeb shivendra singh raje demands the government ysh