यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद विभागीय केंद्र आणि एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने दरमहा राबविण्यात येणाऱ्या चित्रपट चावडी उपक्रमात बुधवारी (१३ मे) ‘नागरिक’ या चित्रपटाचे कलावंत प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.
 एमजीएमच्या आइन्स्टाइन सभागृहात दुपारी ४ वाजता चित्रपट अभिनेते सचिन खेडेकर, शाहीर संभाजी भगत, अभिनेत्री देविका दफ्तरदार, लेखक महेश केळूस्कर व दिग्दर्शक जयप्रद देसाई हे त्यांच्या ‘नागरिक’ चित्रपटाविषयी चित्रपट चावडीच्या प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा यंदाचा सवरेत्कृष्ट सामाजिक चित्रपट या पुरस्कारासह ४ पुरस्कार मिळाले आहेत.
 या तसेच या उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरुसावा यांचा १९५० मध्ये प्रदर्शित झालेला ‘राशोमॉन’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. एका सामुराईचा खून व त्याच्या बायकोवर झालेला बलात्कार या घटनेभोवती चित्रपटाची कथा फिरते. या घटनेचे साक्षीदार असलेला प्रत्येकजण त्यांनी ज्या पद्धतीने घटना पाहिली त्या पद्धतीने त्या दिवशीचा घटनाक्रम विशद करतात. या चित्रपटाची शतकातील सवरेत्कृष्ट चित्रपट कलाकृती असलेल्या चित्रपटात गणना होते. या चित्रपटाला १९५१ सालच्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सवरेत्कृष्ट चित्रपट पुरस्कार, १९५२च्या परदेशी भाषा विभागातील सवरेत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
चित्रपट चावडी हा उपक्रम सर्वासाठी मोफत असून जास्तीत जास्त चित्रपट रसिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, सचिन मुळे, मुकुंद भोगले, सुबोध जाधव आदींनी केले आहे.

Story img Loader