बॉलिवूड विश्वातील सर्वांत मानाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातच्या गिफ्ट सिटी येथे आयोजित करण्यात आला आहे. ६९ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २८ जानेवारीला गुजरात टुरिजमच्या सहाय्याने गुजरात येथे होणार आहे. हा पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित केला जायचा. मात्र, आता गुजरातमध्ये आयोजित करण्यात आल्याने महाराष्ट्रातील विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे.

“मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा!” , असं जयंत पाटील म्हणाले. “दरवर्षी मुंबईत होणारा मानाचा फिल्मफेअर अवॉर्ड आता गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे होणार आहे. आधी महाराष्ट्रातून प्रकल्प पळवले गेले, डायमंड व्यवसाय पळवला गेला. आता फिल्मफेअर अवॉर्डही पळवला गेला आहे. बॉलिवूड हे मुंबईचे अविभाज्य घटक आहे. बॉलिवूडला मुंबईची आर्थिक नाडी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला हलवून मुंबईच्या आणखी एका आर्थिक स्त्रोत्रावर हात मारण्याचे पहिले पाऊल टाकले गेले आहे. मुख्यमंत्री महोदय यावर काय उत्तर द्याल?”, अशी टीकाही जयंत पाटलांनी केली आहे.

bjp leader Kiren rijiju
“राहुल गांधी अजुनही अपरिपक्व नेते”, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांची टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Traders are aggressive due to Sanjay Raut statement Mumbai news
संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे व्यापारी आक्रमक; माफी मागून विधान मागे घ्या, अन्यथा रोषाला सामोरे जा
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…
Dawood t-shirt, Lawrence Bishnoi t-shirt,
दाऊद, लॉरेन्स बिष्णोईचे टीशर्ट विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल; महाराष्ट्र सायबर पोलिसांची कारवाई
Guddi Maruti reveals shocking details about Divya Bharti death
“तोंड रक्ताने माखलेली एक…”, दिव्या भारतीच्या निधनाबद्दल बॉलीवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा; तिला पडताना ‘या’ व्यक्तीने पाहिल्याचा केला दावा

१५ जानेवारी रोजी जियो वर्ल्ड सेंटर येथे फिल्मफेअरकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आली. यंदाचा ६९ वा ह्युंडाई फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे २७ आणि २८ जानेवारी रोजी रंगणार आहे. गुजरात टुरिझमच्या सहकार्याने हा पुरस्कार सोहळा होणार आहे. २०२० चा अपवाद वगळता फिल्मफेअर सोहळा दरवर्षी मुंबईत आयोजित केला जातो. मात्र, यंदा गुजरातमध्ये आयोजित करण्यात आल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेते आता सरकारला धारेवर धरत आहेत. अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले असताना फिल्मफेअर पुरस्कार सोहळाही गुजरातला गेल्याने विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा >> “गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल”, सूरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनात पंतप्रधानांचे वक्तव्य, म्हणाले…

डायमंड बोर्सनंतर पुरस्कार सोहळाही गुजरातला

जगातील सर्वांत मोठं कार्यालय सूरत डायमंड बोर्सचे गेल्या महिन्यात १७ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. डायमंड कंपनीचा सर्वाधिक व्यवसाय मुंबईतून व्हायचा. मात्र, मुंबईतील अनेक डायमंड व्यापारी आता गुजरातला गेल्याने राज्यातील विरोधकांनी याप्रकरणीही सरकारवर तोफ डागली होती. त्याआधीही, महाराष्ट्रात येऊ घातलेले अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने आदित्य ठाकरेंसह अनेकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. आता फिल्मफेअर पुरस्कारही गुजरातला गेल्याने विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. मुंबईच्या आर्थिक विकासात बॉलिवूडचं खूप मोठं योगदान असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे हा पुरस्कार सोहळा गुजरातला गेल्याने मुंबईकरांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातंय.