पंतप्रधान मोदींच्या नावाचा गैरवापर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा गैरवापर करून काही अज्ञात व्यक्तींनी भारतीय सैन्याच्या आधुनिकतेसाठी तसेच शहीद व जखमी जवानांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ‘आर्मी वेलफेअर फंड बॅटल कॅज्युअल्टीज’ या खात्यात पैसे जमा करण्याचे भावनिक आवाहन करणारे संदेश समाज माध्यमावर टाकले आहे. विशेष म्हणजे या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी या खात्यात पैसे केले. प्रत्यक्षात ‘आर्मी वेलफेअर फंड’ या नावाने कुठलेही खाते नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून हे खाते श्री. आरती या व्यक्तीगत नावाने आहे. तसेच या खात्यात जमा होणारे पैसे श्री हरचरण विनय नावाची व्यक्ती ‘एटीएम’व्दारे काढत आहे. देशभक्तीच्या नावावर लोकांच्या आर्थिक फसवणुकीचा हा प्रकार आहे.
सध्याच्या देशभक्तीच्या वातावरणाचा उपयोग काही अज्ञात व्यक्तींनी स्वत:च्या स्वार्थासाठी सुरू केला असून यासाठी पंतप्रधानांच्या नावाचा गैरवापर करून लोकांची आर्थिक फसवणूक सुरू केली आहे. समाज माध्यमावर भारतीय सैन्याच्या आधुनिकतेसाठीचा एक संदेश सतत फिरताना दिसत आहे. या संदेशामध्ये चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याच्या सूचनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सेनेच्या आधुनिकतेसाठी तसेच शहीद व जखमी जवानांच्या मदतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या, नवी दिल्लीतील मुख्य शाखेत ‘आर्मी वेलफेअर फंड बॅटल कॅज्युअल्टी’ या नावाने ३२१३६७१३३७४ या क्रमांकाचे बँक खाते उघडले आहे. या खात्यात प्रत्येक भारतीयाने स्वेच्छेनुसार कितीही रक्कम दान करायची आहे. यात एक रुपयापासून तर कितीही पैसे या खात्यात जमा करू शकतो असे या संदेशात म्हटले आहे. या खात्यात जमा झालेला सर्व पैसा हा भारतीय सेना तथा निमलष्करी दलासाठी शस्त्र खरेदीसाठीही वापरला जाणार आहे. पंतप्रधानांनी ‘मन की बात’सोबतच फेसबुक, ट्टिर, व्हॉट्अॅपच्या माध्यमातूनही लोकांना बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आवाहन केले आहे, असाही उल्लेख या संदेशात आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी स्वत: मंत्रिमंडळ बैठकीत स्टेट बँक ऑफ इंडियात खाते सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे यात म्हटले आहे. भारताला महासत्ता बनण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. भारताच्या १३० कोटी जनतेपैकी ७० टक्के जनतेने केवळ एक रुपयाही या खात्यात जमा केला तर एका दिवसात १०० कोटी रुपये होतील. ३० दिवसांत ३ हजार कोटी आणि एक वर्षांत ३६ हजार कोटी रुपये जमा होतील. पाकिस्तानचे वर्षांचे संरक्षण खात्याचे अंदाजपत्रक ३६ हजार कोटींचे आहे. भारत एक दिवस ‘सुपर पॉवर’ बनेल असे भावनिक आवाहन देशभक्तीच्या नावावर भारतवासीयांना या संदेशातून करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या खात्यात लोक पैसे ही जमा करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ३२१३६७१३३७४ या क्रमांकाचे खाते असले तरी ते आर्मी वेलफेअर फंड बॅटल कॅज्युअल्टी या नावाने स्टेट बँकेच्या नवी दिल्लीतील शाखेत नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांच्या नावाचा गैरवापर करून लोकांकडून पैसे वसूल केले जात आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चंद्रपुरातील शाखेत चौकशी केली असता ३२१३६७१३३७४ या क्रमांकाचे खाते स्टेट बँकेत आहे. मात्र ते श्री.आरती या व्यक्तिगत नावाने असून दिलशान गार्डन, न्यू दिल्ली येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हे खाते आहे आणि या बँकेचा कोड ९३७० हा आहे. तसेच आयएफएससी कोड एसबीआयएन ०००९३७० हा आहे. प्रत्यक्षात समाज माध्यमावरील संदेशात न्यू दिल्ली, लोकल हेड ब्रँच असे म्हटले आहे. या खात्यात जमा होणारा पैसा हा श्री. हरचरण विनय या व्यक्तीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या, उत्तर प्रदेश गाजीयाबाद, सूर्यनगर बँक क्रमांक ११४७८ येथे वळता होत आहे. हरचरण विनय यांच्या खात्यात पैसा वळता झाला की ते लगेच एटीएमव्दारे नियमित पैसे या खात्यातून काढत आहेत.
.. असे कुठलेही खाते नाही
या संदर्भात अधिक माहितीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पर्सनल बँकिंग विभागाचे व्यवस्थापक अनिल गचके यांना विचारणा केली असता, आर्मी वेलफेअर फंड बॅटल कॅज्युअल्टी या नावाने स्टेट बँकेत कुठलेही खाते नाही. आर्मी वेलफेअर फंड बॅटल कॅज्युअल्टी या नावाने दिलेला ३२१३६७१३३७४ हा खातेक्रमांक श्री आरती या व्यक्तिगत नावाने असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे खाते गोठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. विशेष म्हणजे या खात्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत व्यवहार सुरू होते आणि या खात्यातून हरचरण विनय नावाच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा होऊन पुढे तो एटीएममधून काढत असल्याचे दिसून येत आहे.