एजाजहुसेन मुजावर, लोकसत्ता 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर : हिवाळयात गुलाबी थंडीचा मोसम सुरू होताच सोलापूरचा हुरडा खवय्यांना खुणावतो. सध्या हुरडा पाटर्य़ा रंगू लागल्या असून, मऊशार हिरव्याकंच सोनेरी-हिरव्या दाण्यांनी भरलेला हुरडा यंदा प्रथमच प्रचार आणि प्रसारासह विक्रीसाठी नव्या दिल्लीत पोहोचला आहे. देशांतर्गत प्रवास करतानाच यंदा प्रथमच देशाच्या सीमा पार करत २०० किलो हुरडा दुबईलाही रवाना झाला आहे.

हेही वाचा >>> मतदान केंद्रांवरील गोंधळाला लगाम; लोकसभा निवडणुकीत राज्यातील ५० हजार मतदान केंद्रांवर चित्रीकरण

ज्वारीचे कोठार असलेले सोलापूर आणि हुरडा हे समीकरण पूर्वापार आहे. आता या हुरडयाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळत आहे. सोलापूरचे तरुण प्रयोगशील शेतकरी काशीनाथ भतगुणकी यांनी या हुरडयाचा प्रसारासाठी धडपड सुरू केली आहे. त्यांच्या पुढाकारातून यंदा नवी दिल्लीतील राजघाट परिसरात सोलापूरच्या हुरडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटकांनी हुरडयाची लज्जतदार चव घेत उत्तम प्रतिसाद दिला. या वेळी लुसलुशीत, खमंग, पाचूसारखे दाणे असलेल्या हुरडयाबरोबरच ज्वारीची भाकरी, दही-शेंगाचटणी, पिठले, ज्वारीचे पोहे, ज्वारीची बिस्किटे, केक, बाजरीची भाकरी, शेंगा पोळी, धपाटे आदी अस्सल सोलापुरी पदार्थाचाही त्यांनी आस्वाद घेतला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finest solapur hurda get spontaneous response in festival at rajghat delhi zws