जळगाव जिल्हा सहकारी दुध संघ येथील १ कोटी १५ लाख रुपये किमतीचे १४ मेट्रिक टन लोणी व ९ टन दुध पावडर चोरी आणि अपहाराची गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, त्यानंतरही पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही. अखेर खडसेंसह दुध संघाच्या संचालकांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. यानंतर न्यायालयाने आदेश देण्याआधीच पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

एकनाथ खडसे यांनी दुध संघातील चोरी आणि अपहारप्रकरणी फिर्याद नोंदणीसाठी शहर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी दुध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे व कार्यकारी संचालक मनोज लिमये हेही हजर होते. मात्र, फिर्याद दाखल करण्याची विनंती करुनही पोलिसांनी फिर्याद घेण्यास नकार दिला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

यानंतर दुध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी जळगाव येथील मे. मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात धाव घेतली. तसेच आरोपी अनंत अशोक आंबिकर, महेंद्र नारायण केदार व सुनिल चव्हाण यांच्याविरुद्ध फौ. कि. अर्ज नं.८४३/२०२२ हा दि. १५/१०/२०२२ रोजी भादंवि कलम ४०३, ४०६, ४०८, ४२०, ४६५, ४६८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी केली.

हेही वाचा : दूध संघातील भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा नोंदविण्यासाठी खडसेंचा पोलीस ठाण्यातच ठिय्या

या याचिकेवर त्याच दिवशी सुनावणी झाली आणि प्रकरण सोमवारी (१७ ऑक्टोबर) निर्णयासाठी ठेवण्यात आले. त्यामुळे न्यायालय पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याआधीच पोलिसांनी रविवारी सकाळी ३.१५ च्या सुमारास स्वतः फिर्यादी होऊन दुध संघ, अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Story img Loader