औरंगाबाद शहरातील हरसूल कचरा डेपोला आज (सोमवार) सकाळी आग लागली. यानंतर अग्निशमन विभागाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सकाळी कचरा डेपोला आग लागल्याची माहिती पोलिसांकडून अग्निशमन विभागाला देण्यात आली. पदमपुरा अग्निशमन विभागाचे दोन बंब व अधिकारी आर. आर. सुरे, अब्दूल अजीज, व्ही. के. राठोड, एल. एम. मुंगसे आदी रवाना झाले. तर, सिडकोमधील एक पाण्याचा बंब पाठवण्यात आल्याचे अधिकारी संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
तसेच महापालिकेचे तीन पाण्याचे टँकर व कचरा हलवण्यासाठी जेसीबीही पाठवण्यात आला होता. आग नेमकी कशी लागली, याची माहिती मिळू शकली नाही.