करीरोड येथील वन अविघ्न पार्क या इमारतीत आग लागल्याची घटना ताजी असतानाच आता घटकोपरमधील पारेख हॉस्पिटल शेजारी असलेल्या एका इमारतीच्या मीटर रूममध्ये भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शॉट-सर्कीटमुळे ही लाग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा – कर्ज घेण्यासाठी पालिकेकडून फेरीवाल्यांची मनधरणी; अनधिकृत विक्रेत्यांविरोधातील कारवाईही थंडावणार?
घाटकोपर पूर्वेकडील खोखणी लेनमधील सहा मजली ‘विश्वास’ इमारतीच्या मीटर रुमध्ये दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसून २२ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल, पोलीस कर्मचारी, अदानी विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी आणि विभाग कार्यालयाचे कर्मचारी दाखल झाले आहेत.
हेही वाचा – “स्वत:ला बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे तोतये समजतात, पण…”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेनंतर आता उपहारगृहातील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबई अग्निशमन दलाने नुकतीच उपाहारगृहांची झडती घेऊन ९२ उपाहारगृहांना नोटिसा बजावल्या आहेत. उपहारगृह व हॉटेलांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा सुरू असणे बंधनकारक आहे. तसा फलक उपहारगृहाच्या बाहेर लावणेही बंधनकारक असताना अनेक हॉटेल हा नियम पाळत नाहीत.
हेही वाचा – फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप? शिंदे-फडणवीस सरकारबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…
मुंबईत डिसेंबर २०१७ मध्ये कमला मिल येथील पबमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने उपहारगृहातील अग्निरोधक यंत्रणेची तपासणी करण्यास व हॉटेलांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली होती. मात्र, अनेक हॉटेल आजही हा नियम पाळत नसल्याचे आढळून आले आहे. अग्निशमन दलाने नुकतीच मुंबईतील ४४० अस्थापनांमधील अग्निरोधक यंत्रणेची तपासणी केली. त्यात हॉटेलांचीही तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी ९२ हॉटेलांमध्ये अग्निरोधक यंत्रणा नसल्याचे आढळून आले होते. या हॉटेलांना अग्निशमन दलाने १२० दिवसांची नोटीस बजावली असल्याची माहिती अग्निशमन दल प्रमुख संजय मांजरेकर यांनी दिली.