रत्नागिरी तालुक्यातील नेवरे राम रोड येथे शार्ट सर्किटमुळे आंबा आणि काजूची झाडे असलेल्या बागेला भीषण आग लागली. या आगीमध्ये सुमारे १ हजार ८०० आंबा कलमे आणि १ हजार ८०० काजूची कलमे जळून खाक झाली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.नेवरे राम रोड या ठिकाणी लागलेल्या या आगीमुळे बागायतदारचे कोठ्यावधी रुप्याचे नुकसान झाले आहे.
या बागेतून महावितरण कंपनीची वीज वाहिनीची लाईन जाते. त्यामुळे शॉर्टसर्किट मुळे ही आग लागल्याचे बागायतदारा कडून सांगण्यात येत आहे. याठिकाणी यापूर्वीही अशीच चार वेळा ही आग लागली होती. मात्र यावर महावितरण कंपनीकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याचे या बागेचे मालक रमेश जैन यांनी सांगितले. नेवरे येथे लागलेल्या या आगीत सुमारे ३ हजार ६०० आंबा आणि काजूची कलमे ऐन हंगामात जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. ही आग विझवण्याचे प्रयत्न दिवसभर सुरू होते.