लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर: शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये एका टॉवेल कारखान्यात कामगारांच्या खोलीत स्वयंपाक करताना गॕस गळती होऊन लागलेल्या आगीत तीन कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. सकाळी ही दुर्घटना घडली. तिघेही मृत कामगार बिहारी असून ३५ वर्षे वयोगटातील आहेत. मनोज देहुरी, आनंद बगदी आणि सोहादेव बगदी अशी त्यांची नावे आहे. सुदैवाने अन्य कामगार बालंबाल बचावले.

Fire Lonar Rural Hospital, Lonar Rural Hospital Patient died,
बुलढाणा : लोणार ग्रामीण रुग्णालयात अग्नितांडव, रुग्णाचा बेडवरच कोळसा; विडीमुळे…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
pune dumper crushed people on footpath
पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या तिघांना मद्यधुंद डंपर चालकांने चिरडले, तीन जण ठार तर सहा जण जखमी
jewellery shop employee dies in shooting
शहापूर हादरले! सराफाच्या दुकानातील कर्मचाऱ्याचा गोळीबारात मृत्यू
Firing on saraf shop worker in Shahapur
शहापुरातील सरफच्या दुकानातील कामगारावर गोळीबार
Two bike riders die three injured in two separate accidents in Pune city
पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, तिघे जखमी
Massive fire breaks out at plywood factory in Naigaon factory materials burn
नायगाव मध्ये प्लायवूड कारखान्याला भीषण आग, कारखान्यातील साहित्य जळून खाक

अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये कार्यरत रूपम टेक्स्टाईल या टॉवेल उत्पादनाच्या कारखान्यात पश्चिम बंगाल आणि बिहारातील कामगार काम करतात. कारखान्याच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत हे कामगार राहतात. नेहमीप्रमाणे सकाळी स्वयंपाक केला जात असताना गॕस सिलिंडरमधून अचानकपणे गॕस गळती झाली आणि आग लागली. बघता बघता संपूर्ण खोलीने पेट घेतला. त्यावेळी सातपैकी चार कामगार खोलीतून सुखरूपपणे बाहेर पडून स्वतःचे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले. परंतु तीन कामगारांना बाहेर पडता आले नाही. तेथेच उत्पादित टॉवेल आणि खोक्यांचा साठा होता. त्यामुळे भडकलेल्या आगीने रौद्र रूप घेतले होते. आगीत तिन्ही कामगार लपेटले गेले आणि त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

आणखी वाचा-Petrol-Diesel Price on 5 July: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण? पाहा तुमच्या शहरातील दर

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सोलापूर महापालिका अग्निशमन यंत्रणेने तात्काळ धाव घेऊन तासभरात आग आटोक्यात आणली. जळीतग्रस्त खोलीत तिघेही कामगारांचे मृतदेह आढळून आले. कारखाना खालच्या मजल्यात असल्यामुळे तेथे आगीची झळ बसली नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद झाली आहे.

Story img Loader