नांदेड : कंधार येथील भवानीनगर कमानीसमोर असलेल्या औषध विक्रीची दोन व एका कापडाच्या दुकानाला रविवार (दि.2 जून) रोजी सकाळी आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले. या आगीत औषधी दुकानामधील ५० लाख रुपयांची औषधी जळून गेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंधार येथे भवानी नगर कमानीसमोर अमोल यदुराज गबाळे यांचे रिटेल तर आशिष संजय गबाळे यांचे भक्ती मेडिकल नावाने होलसेल दुकान एकाच इमारतीत चालतात. या दुकानांना लागलेली आग लगतच असलेल्या ऐश्वर्या साडी सेंटरपर्यंत पोहोचली.

हेही वाचा…“थोरातांनी दुसऱ्यांचीच तळी उचलण्यात धन्यता मानली”; विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांना टोला; म्हणाले, “थोडी तरी…”

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी खाजगी टँकरच्या सहाय्याने तळमजल्यावरील मेडिकल स्टोअर्सची आग विझवल्यानंतर कंधार नगर परिषदेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. कंधार नगरपरिषदेच्या अग्निशमन पथकाला दुसऱ्या मजल्यावरील दुकानाची आग आटोक्यात येत नसल्याने लोहा नगरपरिषदेच्या अग्निशमन पथकाला पाचारण केल्यानंतर आग आटोक्यात आल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire in nanded s kandhar near bhavani nagar kaman destroys two medicine shops and textile shop losses estimated at rs 50 lakhs psg
Show comments