कराड : आगाशिव डोंगरावरील बौध्दकालीन लेण्यांजवळ अज्ञात समाजकंटकांनी भरउन्हात वणवा लावला. यात चार एकरातील वनसंपदा जळाली. पण, वनाधिकाऱ्यांसह परिसरातील लोकांनी अथक प्रयत्नांतून वणवा विझवला आणि त्यांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने लेण्यांना वणव्याची झळ पोहोचली नाही व वनसंपदेची प्रचंड मोठी होणारी हानीही टळली.

आगाशिव डोंगराला लागलेला हा पहिलाच वणवा असल्याचे परिसरातील लोक सांगतात. आगाशिव डोंगरावर लेण्यांच्या परिसरात अचानक वणवा लागल्याचे जवळच शेतात काम करत असलेल्या कृषिभूषण प्रा. संजय थोरात यांच्या निदर्शनास आले. यावर त्यांच्यासह तेथील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन भडकत्या आगीला विझवण्याचा धोका पत्करून रौद्ररूप धारण करण्यापूर्वीच वणवा शमवला. शेतीमित्र अशोकराव थोरात, लक्ष्मण पवार, वन विभागाचे आनंद जगताप, वनपाल हनुमंत मिठारे आदींनी डोंगरमाथ्यावर पसरलेला हा वाणवा विझवण्यासाठी हवेचे मशीन, झाडांच्या फांद्या आदींचा वापर करून तीन तासांच्या अथक प्रयत्नांतून ही आग आटोक्यात आणली. 

Navi Mumbai, Fire broke out, scrap godown,
नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग 
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Los Angeles Wildfire Video : लॉस एंजेलिसच्या वणव्यात हजारो लोक बेघर, २८८ कोटींचा बंगला जळतानाचा Video Viral
LA Wildfires reason
१६ हजार एकरवर अग्नितांडव; कलाकारांसह अनेकांची घरे भस्मसात, अमेरिकेतल्या भीषण आगीचे कारण काय?
Loksatta explained Why has the issue of ash management in thermal power plants come into the spotlight
विश्लेषण : औष्णिक विद्याुत प्रकल्पातील राख व्यवस्थापनाचा मुद्दा चर्चेत का आला?
Tree cutting in Thane case registered against four people
ठाण्यात वृक्षांची कत्तल, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

हेही वाचा >>> राज्यातील सत्ताबदलावर अजित पवारांचे विधान, म्हणाले “एकनाथ शिंदेंच्या मनात आले आणि…”

यानंतर अशोकराव थोरात माध्यमांशी बोलताना म्हणाले की, डोंगरपायथ्याच्या निसर्गप्रेमींनी फावल्या वेळेत वनसंपदेचे रक्षण करावे. वणवा लावणाऱ्या समाजकंटकांना प्रतिबंध करताना वनखाताच्या चांगल्या कामाला सहकार्य केले पाहिजे. वनाधिकारी तुषार नवले यांनी पावसाळ्यात प्रयत्नपूर्वक लावलेली रोपे व बीजारोपण, बीज गोळे या माध्यमातून उगवलेल्या छोट्या रोपांची वणव्यात राखरांगोळी झाल्याची खंत व्यक्त केली. आगाशिव डोंगरावर पुरातन संपत्ती आहे. ती नष्ट होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. अविचाराने हवा, पाणी, जंगल, जमीन यांची मानवाने हानी केल्याने हवामानात बदल होत आहेत. त्यामुळे आगाशिव डोंगरावर येणाऱ्या पर्यटकांनी वणवा लागू नये, याची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन नवले यांनी या वेळी केले.

Story img Loader