जटपूरा गेट परिसरातील पंचशील चौक वार्डातील मराठी दैनिक चंद्रपूर समाचार वृत्तपत्र कार्यालयाच्या गोदामाला रविवारी सकाळी ११ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत पेपर रोल, कुलर, फर्निचर व इतर सामुग्री जळून खाक झाली. यात सुमारे पाच ते सात लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
चंद्रपूर समाचार वृत्तपत्र कार्यालयात पेपर रोल ठेवण्यासाठी गोदाम आहे. रविवारी सकाळी विद्युत शॉर्ट सक्रीटमुळे अचानक आग लागली. यात संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. आग लागली तेव्हा शेजारच्यांना गोदामातून धूर निघतांना दिसला. त्यांनी याची माहिती चंद्रपूर समाचारचे संस्थापक संपादक रामदास रायपुरे, चंद्रगुप्त रायपुरे यांना दिली. माहिती मिळताच रायपुरे यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला भ्रमणध्वनीवर संपर्क साधताच काही मिनिटांत अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली. पेपर रोल, फर्निचर, कुलर व अन्य साहित्य जळाल्याने यात सुमारे पाच लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
चंद्रपूर समाचार वृत्तपत्र कार्यालयाला आग
जटपूरा गेट परिसरातील पंचशील चौक वार्डातील मराठी दैनिक चंद्रपूर समाचार वृत्तपत्र कार्यालयाच्या गोदामाला रविवारी सकाळी ११ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत पेपर रोल, कुलर, फर्निचर व इतर सामुग्री जळून खाक झाली.
आणखी वाचा
First published on: 18-02-2014 at 01:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire to chandrapur samachar newspaper office